आयशर अन् दुचाकीची धडक, पती ठार पत्नी गंभीर जखमी; अमरावतीतही कारचा भीषण अपघात
अमरावती आणि कल्याणजवळील कर्जत येथे अपघाताच्या घटना घडल्या असून कर्जत येथील अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने अमरावतीत कुठलीही जीवितहानी झाली नाही
Continues below advertisement
Neral Accident amravati
Continues below advertisement
1/8
अमरावती आणि कल्याणजवळील कर्जत येथे अपघाताच्या घटना घडल्या असून कर्जत येथील अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने अमरावतीत कुठलीही जीवितहानी झाली नाही
2/8
अमरावतीमधील जुन्या बायपासवर चारचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतीचा हात दिला.
3/8
भरधाव वेगात असलेली कार थेट उभ्या असलेल्या ट्रकला धडकली, सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कारचे मोठे नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. कार थेट ट्रकखाली गेल्याने कारचा वरील भाग चेंदामेंदा झाला आहे.
4/8
अपघात होताच परिसरात नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती, त्यानंतर कारमधील व्यक्तींना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. तर, ट्रकखाली अडकलेली कारही बाहेर काढण्यात आली आहे.
5/8
कर्जत कल्याण राज्यमार्गावर आयशर टेम्पो आणि मोटरसायकलमध्ये भीषण अपघातात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
Continues below advertisement
6/8
कर्जत कल्याण मार्गावर स्कुटीवरून हे दांपत्य प्रवास करत असताना हा अपघात घडला. एकनाथ बबन शेंडे असे अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव असून पत्नी जयश्री एकनाथ शेंडे यांच्यावर नेरळ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
7/8
नेरळ जवळील बेकरे असलपाडा गावातील राहणारे हे दाम्पत्य मोटर सायकलवरून नेरळच्या दिशेने येत असताना मागून भरधाव येणाऱ्या आयशर टेम्पोच्या चाकाखाली येऊन हा अपघात घडला.
8/8
अपघातानंतर टेम्पो चालक मात्र फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. नेरळ पोलीस फरार टेम्पो चालकाचा शोध घेत आहेत, जखमी पत्नीला बरं होण्यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.
Published at : 04 Jul 2025 09:53 PM (IST)