Jalna Crime: जालन्यात व्यावसायिकाने आयुष्य संपवलं, गाडीतच स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली, घातपाताचा संशय
Jalna Crime news: जालन्यात एका व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. त्याने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली. या घटनेमुळे जालन्यात खळबळ उडाली आहे.
Continues below advertisement
Jalna crime news
Continues below advertisement
1/9
जालना शहरात अंबड चौफुली जवळ एका व्यावसायिकाने पहाटेच्या सुमारास डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
2/9
सकाळी सहाच्या सुमारास काच लावलेल्या कारमध्ये हा मृतदेह आढळून आला.
3/9
सागर धानोरे असे या व्यावसायिकचे नाव असून या घटनेने सकाळी शहरामध्ये खळबळ उडाली.
4/9
मयताच्या नातेवाईकांनी या घटनेवर शंका उपस्थित केली आहे.
5/9
सागर धानोरे याच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
Continues below advertisement
6/9
पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळाची तपासणी होत असून पोलीसदेखील सीसीटीव्ही फुटेजच्य आधारे या घटनेचा कसून तपास करत आहेत.
7/9
पोलिसांनी सागर धानोरे यांच्या गाडीची कसून तपासणी केली.
8/9
सागर धानोरे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
9/9
जालना पोलिसांची मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन घटनास्थळावर आली होती.
Published at : 21 Dec 2025 09:21 AM (IST)