पुण्यातील रेव्ह पार्टी पोलिसांनी उधळली, एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, पाहा PHOTOS
Eknath Khadse : पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांची छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. या एकनाथ खडसे यांच्या जावयाला ताब्यात घेण्यात आले आहे.
Eknath Khadse
1/10
पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांची छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे.
2/10
पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू होती.
3/10
खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये हाउस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू होती.
4/10
रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे.
5/10
यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एकनाथ खडसे जावई आणि महिला प्रदेशाध्यक्षा यांचा नवरा प्रांजल खेवलकर यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.
6/10
प्रांजल खेवलकरसह त्याचा एक मित्र आणि तीन महिला पार्टीत सहभागी झाल्या होत्या.
7/10
या पार्टीत दारु, हुक्का आणि काही प्रमाणात अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
8/10
प्रांजल खेवलकरसह ताब्यात घेतलेल्या इतरांना पोलीसांनी वैद्यकीय चाचणीसाठी ससुन रूग्णालयामध्ये नेण्यात आलं आहे.
9/10
रोहिणी खडसे सध्या या प्रकरणाची माहिती घेत आहेत. त्यामुळे त्यांनी यावर सध्या बोलायला नकार दिला आहे.
10/10
तर एकनाथ खडसे यांनी देखील अद्याप या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
Published at : 27 Jul 2025 10:26 AM (IST)