जेजुरीत ऊसात लपलेल्या चोरट्यांवर ड्रोनच्या गिरक्या; गावातील तरुणाईच्या मदतीने सिनेस्टाईल अटक

चोरट्यांचा पाठलाग करताना सिनेस्टाईल पद्धतीने पोलिसांनी चोरट्यांना अटक केल्याचे अनेकदा पाहण्यात किंवा वाचण्यात आलंय. मात्र, पहिल्यांदाच ड्रोनच्या मदतीने पोलिसांनी चोरट्यांना पकडलं आहे.

Jejuri police arrest thief by drone

1/7
चोरट्यांचा पाठलाग करताना सिनेस्टाईल पद्धतीने पोलिसांनी चोरट्यांना अटक केल्याचे अनेकदा पाहण्यात किंवा वाचण्यात आलंय. मात्र, पहिल्यांदाच ड्रोनच्या मदतीने पोलिसांनी चोरट्यांना पकडलं आहे.
2/7
पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या दौंडज गावामध्ये भर दिवसा दरोडा टाकून पळालेल्या तीन चोरांना पोलीस आणि ग्रामस्थांनी सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद केल.
3/7
पुणे-पंढरपूर मार्गावरील नीरा रेल्वे गेटवर या चोरांना काही तरुणांना अडवले. मात्र या तरुणांना या चोरांनी रिवाल्वर दाखवून ते पळून गेले असे स्थानिकांकडून सांगण्यात आला आहे.
4/7
या दरम्यान तरुणांना एक चोर पकडण्यात यश आलं आहे, तर दोघेजण ऊसामध्ये लपून बसले होते. त्यानंतर पोलिसांनी ड्रोनच्या साह्याने ऊसात लपलेल्या या चोरांचा शोध घेतला
5/7
गावातील तरुणांच्या मदतीने या चोरट्यांना पोलिसानी ताब्यात घेतले.
6/7
पोलीस आणि स्थानिक तरुण यांनी केलेल्या धाडसी कामगिरीचा परिसरातून कौतुक होताना पाहायला मिळतंय तर जेजुरी पोलीस याबाबतचा अधिकचा तपास करत आहेत.
7/7
दरम्यान, गावातील शेतात चोरटे लपल्याची माहिती समजताच स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेत पोलिसांनी सर्वोतोपरी मदत केली, त्यामुळे चोरटे जेरबंद झाले.
Sponsored Links by Taboola