Andhra Pradesh Crime: आंध्रप्रदेशातील धक्कादायक घटना! मुलं हुशार नाहीत म्हणून बापानेच घेतला दोन्ही मुलांचा जीव, नंतर स्वत:लाही संपवलं
मुलांची शैक्षणिक कामगिरी खराब असल्याने वडिलांनीच पोटच्या दोन्ही मुलांची हत्या करत आत्महत्या केल्याची घटना घडलीय .
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआंध्र प्रदेशच्या काकीनाडा शहरात 37 वर्षीय व्यक्तीने मुले हुशार नाहीत म्हणून आपल्या मुलांचा जीव घेतल्याचे समोर आले आहे .
व्ही चंद्र किशोर ओएनजीसी या संस्थेत अकाउंटंट म्हणून कार्यरत होते .त्यांची दोन्ही मुले वय वर्ष सहा व सात वर्षांची असल्याची माहिती आहे .
मुले चांगली शिकली नाही तर पुढे जाऊन त्यांचं काय होणार या चिंतेपोटी होळी दिवशी दोन्ही मुलांना वडिलांनीच ठार केले .त्यानंतर स्वतःचेही आयुष्य संपवले .त्यांची पत्नी राणी या घरी येताच हा धक्कादायक प्रकार समोर आला .
त्यांनी तात्काळ पोलिसांना खबर केली .पोलिसांना त्यांच्या घरात सुसाईड नोटही सापडली .या संपूर्ण प्रकाराचा सर्व अंगाने तपास करण्यात येत आहे .
दोन्ही मुलांना बाथरूम मध्ये संपवण्याचं घृणास्पद कृत्य करत पित्यानेही आत्महत्या केली .मुलांची शैक्षणिक पातळी खराब असल्याने भविष्याची चिंता वाटून त्याने टोकाचे पाऊल उचलण्याची माहिती पोलिसांनी दिली .