झोमॅटोचा शेअर झापुक झुपूक पळणार! देऊ शकतो 45 टक्क्यांनी रिटर्न्स? जाणून घ्या कधी पैसे गुंतवावेत
Zomato Share Price Target : सध्या झोमॅटो या शेअरची सगळीकडे चर्चा आहे. झोमॅटो कंपनीच्या नफ्यात, महसुलात वाढ झाली आहे. त्यामुळेच सीएलएसए या ब्रोकरेज फर्मने झोमॅटो शेअर्स खरेदी केल्यास चांगला नफा मिळू शकतो असा दावा केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसप्टेंबर तिमाहीत झोमॅटोचा महसूल 69 टक्क्यांनी वाढून 4799 कोटी रुपये तसेच नफा 389 टक्क्यांनी वाढून 176 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ही कंपनी भविष्यात 8500 कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे.
22 ऑक्टोबर रोजी हा शेअर 256 रुपयांवर पोहोचला होता. भविष्यात हा शेअर 45 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो, अशी शक्यता लक्षात घेऊन CLSA ने या शेअरसाठी नवे टार्गेट दिले आहे.
CLSA या ब्रोकरेज फर्मने झोमॅटो शेअरसाठी आऊटपरफॉर्म अशी रेटिंग दिली असून टार्गेट 353 रुपयांपासून 370 रुपयांपर्यंत वाढवले आहे.
Nomura या ब्रोकरेज फर्मनेही झोमॅटोचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या ब्रोकरेज फर्मने टार्गेट 280 रुपयांवरून 320 रुपये केले आहे.
CITI या ब्रोकरेज फर्मनेही झोमॅटो शेअरला खरेदी करण्याचा सल्ला दिला असून टार्गेट 300 रुपयांवरून 310 रुपये केले आहे. Goldman sachs या ब्रोकरेज फर्मनेही आपले टार्गेट 280 रुपयांहून 315 रुपये केले आहे.
Jefferies या ब्रोकरेज फर्मने या शेअरला बाय रेटिंग देऊन 335 रुपयांचे टार्गेट दिले आहे. HSBC या ब्रोकरेज फर्मनेही 350 रुपयांचे टार्गेट दिले आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)