Zomato Offer: ग्राहकांसाठी झोमॅटोने पुन्हा लाँच केली 'ही' जुनी ऑफर
झोमॅटोने ग्राहकांसाठी पुन्हा एकदा जुनी ऑफर नव्याने लाँच केली आहे.
Zomato Offer: ग्राहकांसाठी झोमॅटोने पुन्हा लाँच केली 'ही' जुनी ऑफर
1/11
ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने ग्राहकांना आपल्याकडे ओढण्यासाठी पुन्हा एकदा जुनी ऑफर लाँच केली आहे.
2/11
झोमॅटोने Zomato Gold ही ऑफर लाँच केली आहे. त्यानुसार, युजर्सना डायनिंग आणि फूड डिलीव्हरीवर सवलत दिली जाणार आहे.
3/11
या ऑफरसाठी ग्राहकांना तीन महिन्यांसाठी 149 रुपये मोजावे लागणार आहेत.
4/11
Zomato Gold ऑफर घेणाऱ्यांना 10 किमी अंतरात अनलिमिटेड फूड डिलीव्हरीचा लाभ मिळणार आहे. झोमॅटो गोल्ड हे जुने नाव असले तरी ब्रांड न्यू मेंबरशिप आहे.
5/11
यामध्ये ग्राहकांना फ्री डिलिव्हरीचा लाभ मिळणार आहे. त्याशिवाय, पिक टाइममध्ये व्हीआयपी अॅक्सेससह इतरही फायदे मिळणार आहेत.
6/11
ज्या ग्राहकांकडे प्रो अथवा प्रो प्लस मेंबरशिप एडिशन कार्डसह मिळाली आहे. त्यांची मेंबरशिप 23 फेब्रुवारी 2023 पर्यंत अॅक्टिव्ह राहिल.
7/11
त्यानंतर त्यांना झोमॅटो गोल्डची तीन महिन्यांची मेंबरशिप दिली जाईल.
8/11
झोमॅटोने आपली 10 मिनिटात फूड डिलिव्हरी करणारी Zomato Instant स्किम सध्या गुंडाळली आहे.
9/11
दिल्ली एनसीआर आणि बंगळुरूमध्ये Zomato Instant ही सुविधा सुरू केली होती.
10/11
मात्र, Zomato Instant ला ग्राहकांकडून फारसा मोठा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे किमान खर्च ही वसूल होत नव्हता.
11/11
कंपनीकडून Zomato Instant ही खास सुविधा कालांतराने पुन्हा एकदा रिलाँच करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Published at : 24 Jan 2023 11:09 PM (IST)