LIC Share : एलआयसी शेअरने का गाठला नीचांक, जाणून घ्या
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीच्या गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. एलआयसीच्या शेअर दरात सातत्याने सुरू असलेली घसरण आजही कायम राहिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएलआयसीच्या शेअर दराने आतापर्यंतचा नीचांकी दर गाठला आहे. एलआयसीच्या शेअर दरात पाच टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली असून 700 रुपयांखाली शेअर दर पोहचला आहे.
शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीने चिंतेत असलेल्या गुंतवणूकदारांची चिंता एलआयसीने पुन्हा एकदा वाढवली आहे. एलआयसीने आज 669.50 रुपयांचा नीचांकी दर गाठला.
आयपीओ किंमतीच्या तुलनेत जवळपास 28 टक्क्यांची घसरण झाली असून गुंतवणूकदारांना प्रति शेअर 260 हून अधिक रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
ॲंकर इन्व्हेस्टर्ससाठी असलेला लॉक-इन कालावधी आज, 13 जून रोजी संपला आहे. एलआयसीच्या शेअरमध्ये होत असलेल्या पडझडीमुळे लॉक-इन कालावधी संपताच ॲंकर इन्व्हेस्टर्सकडे आपले शेअर्स विकण्याचा पर्याय आहे.
शेअर्सच्या किमती घसरल्याने हे ॲंकर इन्व्हेस्टर्सही मोठ्या तोट्यात आहेत.
ॲंकर इन्व्हेस्टर्सने त्यांच्याकडील शेअर्स विक्री सुरू करू शकतात. याच दबावातून शेअर विक्री सुरू असल्याचे म्हटले जात आहे.