आरोग्य विम्याचा क्लेम कंपन्या का नाकारतात? 'ही' आहेत 6 प्रमुख कारणं?

अनेकदा आरोग्य विम्याचा क्लेम स्वीकारला जात नाही. तो रिजेक्ट होतो. त्याची अनेक कारणे आहेत. त्यामुळे योग्य ती काळजी घेऊन आरोग्य विम्याचा क्लेम भरायला हवा.

HEALTH INSURANCE CLAIM (फोटो सौजन्य- META AI)

1/6
आरोग्य विम्याचा क्लेम विमा कंपन्या अनेकदा स्वीकारत नाही. विमा न स्वीकारला जाण्याची काही कारणं आपण जाणून घेऊ या. अनेकदा पॉलिसीधारक विमा घेताना वय, उत्पन्न, नोकरी याबाबत चुकीची माहिती देतात. त्यामुळे विमा कंपन्या आरोग्य विम्याचा क्लेम रिजेक्ट करतात.
2/6
विमा क्लेम करण्यासाठी एक निश्चित कालावधी असतो. हा कालावधी एकदा निघून गेल्यानंतर क्लेम केल्यास विमा कंपन्या तो स्वीकारत नाहीत.
3/6
आरोग्य विमा घेताना अनेकजण आपले जुने आजार लपवून ठेवतात. प्रिमियम वाढू नये म्हणून अनेकजण ही शक्कल लढवतात. मात्र नंतर क्लेम करताना ही शक्कल चांगलीच महागात पडते. आशा स्थितीत आरोग्य विमा कंपन्या क्लेम रिजेक्ट करतात.
4/6
तुम्ही काढलेल्या विम्याची खर्च मर्यादा असते. तुम्ही क्लेम करताना या मर्यादेपेक्षा अधिक रक्कम क्लेम केल्यास विमा कंपनी अशा प्रकारचा क्लेम फेटाळून लावते.
5/6
क्लेम करताना योग्य ती कागदपत्रे न दिल्यामुळेही विमा कंपन्या क्लेम रिजेक्ट करतात.
6/6
तुमच्या आरोग्य विम्यात नेमक्या कोणत्या आजारांचा समावेश आहे, हे अदोदर जाणून घेतले पाहिजे. पॉलिसीच्या अटी वाचायला हव्यात. विम्यात समावेश नसलेल्या आजासाठी तुम्ही क्लेम केल्यास तो स्वीकारला जात नाही.
Sponsored Links by Taboola