Share News : लागली लॉटरी! व्होडाफोन-आयडियाच्या शेअरमध्ये 24 टक्क्यांची उसळण
कर्जबाजारी असलेल्या एका टेलिकॉम कंपनीच्या शेअरमध्ये आज तेजी दिसून आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे या कंपनीच्या शेअर दराने चांगलीच उसळण घेतली. हा शेअर व्होडाफोन-आयडिया कंपनीचा आहे.
व्होडाफोन आयडियाच्या समभागांनी आज सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात 24 टक्क्यांपर्यंत उसळी घेतली. सरकारच्या निर्णयानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी पाहायला मिळत असल्याचे म्हटले जात आहे.
शुक्रवारी केंद्र सरकारने कर्जबाजारी व्होडाफोन आयडियाच्या 16,133 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्याज देय रकमेचे इक्विटीमध्ये रूपांतर करण्यास मंजुरी दिली.
प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले इक्विटी शेअर्स या किमतीवर सरकारला जारी केले जातील. त्यानंतर सोमवारी हा शेअर 8.35 रुपयांवर पोहोचला. याआधी शुक्रवारी हा शेअर 6.89 रुपयांवर व्यवहार करत होता.
व्याजाच्या रक्कमेपोटी केंद्र सरकारला व्होडाफोन -आयडिया कंपनीत भागीदारी मिळाली आहे.
त्यामुळे आता या कंपनीत भारत सरकारची भागिदारी ही जवळपास 35 टक्के इतकी होणार आहे.
व्होडाफोन आयडिया कंपनीत आता प्रमोटर कंपनी व्होडाफोन ग्रुपचा (Vodafone) हिस्सा 28.5 टक्के आणि आदित्य बिर्ला कंपनीचा हिस्सा 17.8 टक्के इतका होणार आहे.
मागील काही वर्षांपासून व्होडाफोन आयडिया कंपनी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे.
व्होडाफोन आणि आयडिया कंपनीचे विलीनीकरण होऊन, व्होडाफोन-आयडिया ही नवीन कंपनी स्थापन झाली. मात्र, भारतीय बाजारपेठेत सुरू झालेल्या टॅरीफ वॉरमुळे व्होडाफोन-आयडिला मोठा धक्का बसला.