अनेकवेळा अर्ज करूनही बँक क्रेडिट कार्ड का देत नाही? 'ही' आहेत प्रमुख कारणं, जाणून घ्या
Credit card news: कित्येकवेळी क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करूनही ते मिळत नाही. अनेकवेळा बँका तुमचा अर्ज फेटाळतात. तुम्हाला क्रेडिट कार्ड न मिळण्याला अनेक बाबी जबाबदार आहेत. यातील काही प्रमुख कारणं जाणून घेऊ या..
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्ही कमी कालावधीत अधिक नोकऱ्या बदलल्यास क्रेडिट कार्ड मिळायला अडचणी येतात. लवकर लवकर नोकरी बदलणाऱ्यांना क्रेडिट कार्ड देणे बँका धोकायक असल्याचे मानतात. त्यामुळे अशा स्थितीत क्रेडिट कार्ड न मिळण्याची शक्यता जास्त असते.
जेव्हा तुमचा क्रेडिट स्कोअर फारसा चांगला नसतो, तेव्हादेखील तुमचा क्रेडिट कार्डसाठीचा अर्ज फेटाळला जातो. तुम्ही लोन डिफॉल्टर आहात किंवा एखादा इएमआय दिलेला नसेल तर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो.
अनेक क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांचाही नव्या क्रेडिट कार्डचा अर्ज फेटाळला जातो. त्यामुळे जास्त क्रेडिट कार्ड ठेवू नये.
पहिल्यांदाच जास्त क्रेडिट लिमीट असलेले क्रेडिट कार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नका. अगोदर कोणतीही वार्षिक फी नसेलेले क्रेडिट कार्ड घेण्याचा प्रयत्न करा.
क्रेडिट कार्ड अप्रुव्ह करण्याआधी बँका तेसच एनबीएफसी तुमची क्रेडिट हिस्ट्री चेक करतात. तुम्ही अनेक बँकात अनेक क्रेडिट कार्डसाठी अप्लाय केले असेल तर तुमचा क्रेडिट कार्डचा अर्ज फेटाळला जातो.
खराब सिबील स्कोअरसह तुमची कोणतीही क्रेडिट हिस्ट्री नसेल तर बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड देत नाहीत. ज्या लोकांमध्ये कर्ज फेडण्याची क्षमता असते अशाच लोकांना बँक क्रेडिट कार्ड देते.
कमी पगार असल्यामुळेही बँका क्रेडिट कार्ड देत नाहीत. बँका तुमची रिपेमेंट कॅपेसिटी चेक करतात. त्यासाठी तुमची सॅलरी स्लीप आणि फॉर्म- 16 मागितला जातो. अशा स्थितीत तुमचा पगार कमी असेल तर तुम्हाला क्रेडिट कार्ड दिले जात नाही.