दिलासादायक! घाऊक महागाई दराने गाठला 21 महिन्यातील नीचांक

नोव्हेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर घसरला आहे. नोव्हेंबर महिन्यातील घाऊक महागाईचा दर मागील 21 महिन्यानंतरचा नीचांक दर आहे.

WPI: दिलासादायक! घाऊक महागाई दराने गाठला 21 महिन्यातील नीचांक

1/10
नोव्हेंबर महिन्यात महागाई दरात (Inflation Rate) मोठी घट झाली.
2/10
नोव्हेंबर महिन्यात घाऊक महागाईचा ( Wholesale Price Index) दर 5.85 टक्क्यांपर्यंत घसरला आहे.
3/10
मागील 21 महिन्यातील हा सर्वात कमी घाऊक महागाई दर आहे.
4/10
वाणिज्य मंत्रालयाने आज घाऊक महागाई दराची आकडेवारी जाहीर केली. दोन महिन्यांपूर्वी, WPI महागाई दर 10.55 टक्क्यांच्या पातळीवर होता.
5/10
नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाई दर 4.70 टक्क्यांनी घसरला आहे.
6/10
ऑक्टोबर महिन्यात घाऊक महागाईचा दर 8.39 टक्के होता.
7/10
मागील वर्षी नोव्हेंबर 2021 मध्ये घाऊक महागाईचा दर 14.87 टक्के होता.
8/10
ऑक्टोबरमध्ये घाऊक निर्देशांकात 0.39 टक्के वाढ दिसून आली होती. परंतु नोव्हेंबरमध्ये 0.26 टक्क्यांनी घट झाली.
9/10
अन्नधान्याची महागाई ही मागील 22 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर 2.17 टक्क्यांवर आली आहे.
10/10
इंधन आणि विजेचा महागाई दरही ऑक्टोबरमधील 23.17 टक्क्यांवरून नोव्हेंबरमध्ये 17.35 टक्क्यांवर आला आहे.
Sponsored Links by Taboola