दिलासादायक! सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाई दरात घट
सप्टेंबर महिन्यात सामान्यांना महागाईत काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसप्टेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर (Inflation Rate)घटला आहे. मागील महिन्यात घाऊक महागाईचा दर 10.70 टक्के (Wholesale Inflation Rate) इतका नोंदवण्यात आला.
ऑगस्ट महिन्यात हा महागाई दर 12.41 टक्क्यांवर होता. सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर 11 टक्क्यांहून अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता.
घाऊक महागाईच्या दरात घसरण झाल्याने सरकारला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
खाद्यपदार्थांच्या किंमतीत किंचित घट झाल्याने घाऊक महागाईचा दर घटला असल्याचे समोर आले आहे.
वर्ष 2021 मध्ये सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर 11.8 टक्क्यांवर होता. त्यानंतर आता या वर्षी घाऊक महागाईचा दर 10.70 टक्के एवढा झाला.
या वर्षी मे महिन्यात घाऊक महागाई दराने 15.88 टक्के एवढा आकडा गाठला होता.
सप्टेंबरपासून सलग 10 महिने घाऊक महागाईचा दर हा 10 टक्क्यांहून अधिक राहिला आहे.
सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर 7.41 टक्क्यांवर गेला. ऑगस्ट महिन्यात हा दर 7 टक्के इतका होता.
त्याशिवाय, खाद्य पदार्थांचा महागाई दर 7.62 टक्क्यांवरून 8.60 टक्क्यांवर पोहोचला आहे.
शहरी आणि ग्रामीण महागाई दरातही वाढ झाली असल्याचे नोंदवण्यात आले आहे.