FD Rates: मुदत ठेवींवर छोट्या बँकांकडून मोठा परतावा, ठेवीदारांना सर्वाधिक व्याजदर कोणती बँक देते?

Fixed Deposit Rates: गुंतवणूकदार छोट्या बँका म्हणजेच स्मॉल फायनान्स बँकांमध्ये मुदत ठेव ठेवून चांगला परतावा मिळवत आहेत.मोठ्या बँकांच्या तुलनेत या बँका 1 ते 1.25 टक्के परतावा अधिक आहे.

मुदत ठेवीवर सर्वाधिक व्याज कोण देतं?

1/5
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक (Utkarsh Small Finance Bank) ग्राहकांना मुदत ठेवीवर 8.5 टक्के व्याज देत आहेत. हा व्याज दर 2 ते 3 वर्षांच्या मुदतीसाठी आहे.
2/5
यूनिटी स्मॉल फायनान्स बँक (Unity Small Finance Bank) ग्राहकांना 1001 दिवसांसाठी मुदत ठेवीवर 9 टक्के व्याज देत आहे. बँक किंवा स्मॉल फायनान्स बँक यांच्यामध्ये सर्वाधिक आहे.
3/5
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक (Equitas Small Finance Bank) देखील एफडी वर 8.5 टक्के व्याज देत आहे. मात्र, मुदत ठेवीचा कालावधी 2 वर्षांपासून जास्त आणि तीन वर्षांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे.
4/5
एचडीएफसी बँक (HDFC Bank) देशातील मोठी बँक आहे. मात्र बँकेकडून 7.4 टक्के व्याज दिलं जातं. वयोवृद्ध नागरिकांसाठी 0.50 टक्के अधिक व्याज मिळेल. मात्र, त्यावेळी देखील व्याज दर 8 टक्के कमी राहतो.
5/5
स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) ही देशातील सर्वात मोठी सहकारी बँख आहे. या बँकेकडून कमाल 7.25 टक्के व्याज दिलं जातं. मात्र, त्यासाठी 444 दिवस मुदत ठेव करावी लागले.
Sponsored Links by Taboola