अनेकवेळा ट्राय करूनही आयपीओ अलॉट होत नाहीये? फक्त 'या' चार ट्रिक वापरा, काम झालंच म्हणून समजा!
अनेकवेळा आयपीओसाठी अर्ज करुनही अनेकदा तो अलॉट होत नाही. तसे होऊ नये म्हणून काही ट्रिक वापरता येतील. यातील पहिली ट्रिक म्हणजे कंपनीने निश्चित केलेल्या प्राईज बँडवर तुम्ही आयपीओ खरेदी करायला पाहिजे. तसे केल्यास आयपीओ अलॉट होण्याची शक्यता वाढते समजा एखाद्या आयपीओचा किंमत पट्टा हा 95-100 रुपये आहे. तर गुंतवणूक करताना 100 रुपयांच्यावर म्हणजेच प्राईस बँडवर बोली लावली पाहिजे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयपीओ अलॉट व्हावा असे वाटत असेल तर एकापेक्षा अधिक खात्यावरून गुंतवणूक करायला हवी. एकाच अकाऊंटवरून आयपीओसाठी मोठी बोल करू नये. ओव्हर सबस्क्राईब होण्याची शक्यता असणाऱ्या आयपीओसाठी ही ट्रिक फायदेशीर ठरू शकते.
आयपीओसाठी शेवटच्या क्षणाला अर्ज करू नये. योग्य वेळेवर अर्ज करणे कधीही चांगले. आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाल्यानंतर पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी अज करावा.
आयपीओसाठी अर्ज भरताना काळजी घ्या. तुम्ही भरत असलेली रक्कम, तुमचे नाव, डीपी आयडी, बँकेचा तपशील आदी माहिती काळजीपूर्व भरा. तांत्रिक अडचणीमुळे अर्ज बाद होऊ नये म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे.
तुम्ही शेअर होल्डर कॅटेगिरीतून अर्ज केल्यास आयपीओ अलॉट होण्याची शक्यता जास्त असते. या श्रेणीतून अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आयपीओ येणाऱ्या पालक कंपनीचा एक तरी शेअर असणे गरजेचे आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)