ई-श्रम कार्ड योजना आहे तरी काय? दोन लाखांपर्यंत मिळतो अपघात विमा; जाणून घ्या..
असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी ई-श्रम योजना ही एक संजवनी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया योजनेच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीला दोन लाखांचा विमा मिळतो.
या योजनेसाठी तुम्ही नावनोंदणी केल्यास तुम्हाला आर्थिक मदतीशिवाय दुर्घटना झाल्यास दोन लाख रुपयांपर्यंत विमा कवच मिळते.
ई-श्रम योजनेचा लाभ फेरीवाला, भाजी विक्रेता, घरकाम करणारी व्यक्ती असे कोणीही घेऊ शकतो.
उद्योजकाला, करपात्र असणाऱ्या व्यक्तीला या योजनेअंतर्गत अर्ज करता येत नाही.
ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर संबंधित अर्जदाराचे एक कार्ड तयार होते. या कार्डच्या मदतीने दुर्घटना झाल्यास दोन लाख रुपयांचा विमा कवच मिळतो.
या ई-श्रम योजनेसाठी अर्ज करावयाचा असेल तर त्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, बँकेचे पासबुक आदी कागदपत्रांची गरज असते.