Multibagger Stock: 5 वर्षात 65000 हजारांचे 1 कोटी बनले, 'या' मल्टीबॅगर स्टॉककडून 2 वर्षात 5800 टक्के रिटर्न, गुंतवणूकदार मलामाल

Viceroy Hotels Share Return: या कंपनीचा शेअर 4 एप्रिलला 116.20 रुपयांवर होता.कंपनीचं बाजारमूल्य 800 कोटी रुपये आहे. या शेअरनं चांगला परतावा दिला आहे.

मल्टीबॅगर स्टॉकनं गुंतवणूकदार मालामाल

1/5
Multibagger Share: हॉस्पिटलिटी सेक्टरमधील व्हायसरॉय हॉटेल या स्टॉकनं गुंतवणूकदारांना रिटर्न देऊन मालामाल केलं आहे. बीएसईच्या माहितीनुसार या शेअरनं एका वर्षात 191 टक्के रिटर्न दिला आहे. तर, दोन वर्षात शेअर 5800 टक्के वाढला आहे. पाच वर्षात या शेअरनं 16 हजार टक्के प्रगती केली आहे.
2/5
व्हायसरॉय हॉटेल हा मल्टीबॅगर स्टॉक 4 एप्रिल 2025 ला 116.20 रुपयांवर बंद झाला आहे. गेल्या पाच वर्षात या शेअरनं 15817 टक्के परतावा दिला आहे. यानुसार आकडेमोड केल्यास असं दिसतं की ज्यानं या स्टॉकमध्ये 25000 रुपये गुंतवले असतील त्याचे 39 लाख रुपये झाले असते.
3/5
एखाद्या गुंतवणूकदारानं या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 50 हजार रुपये गुंतवले असतील तर त्याचे 79 लाख रुपये झाले असते. याशिवाय ज्यानं 65000 रुपयांचे शेअर घेतले असतील त्याचे 1 कोटी रुपये झाले असते. हा शेअर गेल्या महिन्यात 12 टक्के वाढला आहे. कंपनीचं बाजारमूल्य 800 कोटी आहे.
4/5
डिंसेबर 2024 ला संपलेल्या तिमाहीत या कंपनीतील प्रमोटर्सची भागिदारी 84.11 रुपये होती. तर, दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. 52 आठवड्यांचा उच्चांक 135.25 रुपये तर 52 आठवड्यांचा निचांक 39.89 रुपये इतका होता.
5/5
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Sponsored Links by Taboola