IPO Update : अर्बन कंपनीच्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांनी पैसा ओतला, IPO तब्बल 104 पट सबस्क्राइब, शेअर बाजारावर लिस्ट कधी होणार?
Urban Company IPO : अर्बन कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. सर्वाधिक सबस्क्राइब होणारा 2025 मधील पहिला आयपीओ अर्बन कंपनी ठरलाय.
अर्बन कंपनी आयपीओ अपडेट
1/5
भारतीय शेअर बाजारात यंदा मोठ्या प्रमाणात आयपीओ आले आहेत. येत्या काळात देखील रिलायन्स जिओ, एलजी इलेक्ट्रॉनिक्स सारख्या कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. अर्बन कंपनीनं आणलेला आयपीओ तब्बल 103.63 पट सबस्क्राइब झाला आहे. अर्बन कंपनीकडून आयपीओद्वारे 10, 67, 73,244 शेअरची विक्री केली जाणार आहे.
2/5
अर्बन कंपनीचा आयपीओ संस्थात्मक मान्यता प्राप्त गुंतवणूकदारांकडून म्हणजेच क्यूआयबीकडून 140.20 पट सबस्क्राइब करण्यात आला आहे. गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांकडून आयपीओ 74 .04 पट सबस्क्राइब करण्यात आला.
3/5
रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांकडून आयपीओ 39.25 पट सबस्क्राइब करण्यात आला आहे. अर्बन कंपनीनं अँकर इन्वेस्टर्सकडून 854 कोटी रुपये उभारले आहेत. अर्बन कंपनीनं आयपीओसाठी किंमतपट्टा 98-103 रुपये निश्चित केला आहे. अर्बन कंपनी आयपीओच्या माध्यमातून 1900 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. 15 सप्टेंबरला आयपीओ अलॉट होईल तर येत्या 17 सप्टेंबरला आयपीओ शेअर बाजारावर लिस्ट होण्याची शक्यता आहे. एका लॉटमध्ये 145 शेअर आहेत.
4/5
अर्बन कंपनीकडून आयपीओच्या माध्यमातून उभारलेल्या निधीचा वापर तंत्रज्ञानाच्या विकासासाठी, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, ऑफिसच्या भाड्याची रक्कम देण्यासाठी, मार्केटिंग आणि जनरल कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरण्यात येणार आहे. अर्बन कंपनी भारताशिवाय, संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर, सौदी अरेबियात कार्यरत आहे. अर्बन कंपनी पेस्ट कंट्रोल, स्वच्छता, इलेक्ट्रिकल वर्क, प्लंबिंग, कारपेंट्री, उपकरण दुरुस्ती याप्रकारच्या सेवा पुरवते.
5/5
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 13 Sep 2025 03:39 PM (IST)