दीड रुपयांचा शेअर 600 रुपयांच्या पुढे, लाखांचे झाले कोटी रुपये, वर्षात 38,000 टक्क्यांनी रिटर्न्स देणारी 'ही' कंपनी कोणती?
रिन्यूएबल एनर्जी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या उजास एनर्जी लिमिटेड या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बम्पर रिटर्न्स दिले आहेत. एका वर्षात या कंपनीने अनेकांना करोडपती केलंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएका वर्षाआधी या कंपनीच्या शेअरचे मूल्य फ्त 1.70 रुपये होते. आता हाच शेअर तब्बल 652.90 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच एका वर्षात या शेअरमध्ये तब्बल 38000 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
हा शेअर मल्टिबॅगर शेअर म्हणून नावारुपाला आला आहे. गेल्या सहा महिन्यांतही या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न्स दिले आहेत. ऑगस्ट महिन्यात या शेअरचे मूल्य 325 रुपये होते. आता हाच शेअर 600 रुपयांच्याही पुढे गेला आहे.
दोन महिन्यांत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. तीम महिन्यांआधी या कंपनीच्या शेअरचे मूल्य 210 रुपये होते. आता हा शेअर 600 रुपयांच्याही पुढे गेला आहे.
म्हणजेच या कंपनीत काही महिन्यांपूर्वी एखाद्याने 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्या पैशांचे मूल्य आज तीन कोटी रुपये झाले असते.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
सांकेतिक फोटो