UAN EPFO : पीएफ खात्यासाठी आवश्यक असतो UAN क्रमांक, यूएएन सक्रीय कसा करणार?

UAN EPFO :खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून ठराविक रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये ठेवली जाते. ईपीएफओमध्ये ही रक्कम जमा केली जाते.

Continues below advertisement

यूएएन क्रमांक

Continues below advertisement
1/5
खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून ठराविक रक्कम पीएफ म्हणून ईपीएफओकडे जमा केली जाते. ईपीएफओकडून प्रत्येक कर्मचाऱ्याला यूएएन क्रमांक दिला जातो.
2/5
आपल्या पगारातून वजा करुन पीएफ खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम पाहण्यासाठी, पासबूक पाहण्यासाठी किंवा पीएफची रक्कम काढण्यासाठी यूएएन क्रमांक माहिती असणं आवश्यक असतं.
3/5
यूएएन क्रमांक पहिल्यांदा जिथं नोकरीला लागतो तेथील कंपनी व्यवस्थापनाकडून ईपीएफओच्या पोर्टलवर नोंदणी करुन तयार केला जातो. हा यूएएन क्रमांक कर्मचाऱ्याला सक्रीय करावा लागतो.
4/5
कर्मचाऱ्याच्या पगाराच्या 12 टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा होते. पीएफ खाते सक्रीय करण्यासाठी यूएएन क्रमांक आवश्यक असतो.
5/5
यूएएन सक्रीय करण्यासाठी प्रथम ईपीएफओच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या पोर्टला भेट देणं आवश्यक आहे. तिथं यूएएन सक्रीय करण्याच्या लिंकवर क्लिक करावं लागेल. तिथं यूएएन क्रमांक नोंदवावा लागेल, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड यापैकी एक क्रमांक नोंदवावा, नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी भरल्यानंतर गेट अथॉरायझेशन पिन वर क्लिक करा. यानंतर ओटीपी मिळेल. यूएएनच्या पोर्टलवर ओटीपी नोंदवून यूएएन खातं सक्रीय होईल.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola