UPI वापरताना लक्षात ठेवाव्यात अशा ५ गोष्टी!
पैशाचा व्यवहार सोपा झाला आहे, पण सुरक्षितता विसरू नका!
UPI
1/10
UPI (Unified Payments Interface) मुळे आज पैशांची देवाणघेवाण सहज झाली आहे. पण जशी सोय वाढली, तशी फसवणुकीची शक्यता देखील! त्यामुळे UPI वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
2/10
१. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका फसवणूक करणारे बनावट लिंक पाठवून तुमचं UPI अॅक्सेस घेऊ शकतात. पैसे येण्यासाठी कोणी QR कोड किंवा लिंक पाठवत नाही, अशा लिंक्स टाळा.
3/10
२. UPI PIN कुणालाही सांगू नका कोणताही बँक अधिकारी, अॅप कर्मचारी तुमचा PIN मागत नाही. PIN ही वैयक्तिक माहिती आहे, कधीही शेअर करू नका.
4/10
३. 'Request Money' नोटिफिकेशन काळजीपूर्वक तपासा कोणी पैसे मागतंय की पाठवतंय, हे बघा! चुकून ‘Allow’ केल्यास पैसे जाऊ शकतात.
5/10
अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या रिक्वेस्ट्सला लगेच स्वीकारू नका.
6/10
४. केवळ अधिकृत अॅप्स वापरा फक्त BHIM, GPay, PhonePe, Paytm सारखी ओळखलेली अॅप्स वापरा.
7/10
अनोळखी किंवा नविन अॅप्सपासून सावध रहा.
8/10
५. व्यवहारानंतर SMS/ईमेल तपासा प्रत्येक व्यवहारानंतर बँकेकडून येणारा SMS किंवा मेल तपासा.
9/10
कधी पैसे कापले गेले आणि नोंद राहिली नाही, हे वेळेवर कळू शकतं.
10/10
UPI वापरणं सोपं आहे, पण सतर्क राहणं गरजेचं आहे
Published at : 15 Jul 2025 09:41 AM (IST)