रेल्वे निर्मिती क्षेत्रातील 'या' कंपनीची बुलेट ट्रेनप्रमाणे कामगिरी, भविष्यातही गुंतवणूकदार होणार मालामाल?
Texmaco Rail share: शेअर बाजारात शुक्रवारी मोठ्या घडामोडी घडल्या. शुक्रवारी रेल्वे क्षेत्राशी संबंधित असलेल्या टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीच्या शेअरचे मूल्य चांगलेच वाढले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआठवड्याच्या शेवटच्या दिवशी हा शेअर साधारण 9 टक्क्यांनी वाढून 222.30 रुपयांवर पोहोचला. दिवसाअखेर हा शेअर 215.45 रुपयांवर स्थिरावला. अगोदरच्या दिवसाच्या तुलनेत हा शेअर 4.74 टक्क्यांनी वाढला.
या शेअरचे मूल्य जून 2023 मध्ये 71.57 रुपये होते. हे मूल्य गेल्या 52 आठवड्यांतील सर्वांत निचांकी मूल्य आहे.
या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते हा शेअर सध्या चांगल्या स्थितीत दिसतोय. बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार रेलिगेयर ब्रोकिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष (रिटेल रिसर्च) रवि सिंह यांच्या मतानुसार हा शेअर भविष्यात 235 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
त्यामुळे या शेअरमध्ये गुंतवणूक करत अशाल तर 205 रुपयांचा स्टॉप लॉस लावायला हवा. एका महिन्यात हा शेअर 200 रुपये ते 235 रुपयांच्या रेंजमध्ये असेल.
या कंपनीचे कोलकात्यात मुख्यालय आहे. ही एक इंजिनिअरिंग आणइ इन्फ्रा कंपनी आहे. रेल्वेनिर्मितीच्या क्षेत्रात ही कंपनी काम करते. मार्च 2024 पर्यंत या कंपनीत प्रमोटर्सचा हिस्सा 48.14 टक्के होता.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)