Air India Air Vistara: एअर इंडिया आणि एअर विस्ताराचा विलीनीकरणाचा मार्ग मोकळा
एअर इंडिया आणि एअर विस्ताराचा विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. डिसेंबर 2024 पर्यंत या विमान कंपन्यांचे विलीनीकरण होईल अशी माहिती आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविस्तारा एअरलाइन्स मधील भागीदार असलेल्या सिंगापूर एअरलाइन्सच्या संचालक मंडळाने विलीनीकरणास मान्यता दिली आहे.
सिंगापूर एअरलाइन्सच्या बोर्डाच्या या निर्णयामुळे टाटा समूहाला मोठा दिलासा मिळाला आहे. 'टाटा'ला त्यांचे चार एअरलाईन्स ब्रँड एअर इंडिया लिमिटेडमध्ये विलीन करायचे आहेत.
या करारानुसार सिंगापूर एअरलाइन्स एअर इंडियामध्ये 2058 कोटींची गुंतवणूक करणार आहे.
सिंगापूर एअरलाइन्सने यासंदर्भात एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे विस्तारा ही सिंगापूर एअरलाइन्स आणि टाटा सन्स यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे.
भविष्यात एअरलाइनच्या कामकाजात आणखी सुधारणा करण्यासाठी निधीची गरज भासल्यास या दोन कंपन्या ते पुरवतील. टाटा सध्या विस्तारामध्ये 51 टक्के तर सिंगापूर एअरलाइन्सकडे 49 टक्के हिस्सा आहे.
या विलीनीकरणानंतर स्थापन झालेली नवी कंपनी देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असेल.
टाटा सन्स एअरएशिया इंडिया आणि एअर इंडिया (Air India) एक्सप्रेसचे विलीनीकरण करण्याच्या योजनेवरही काम करत आहे.
टाटा सन्सने 18,000 कोटी रुपयांची बोली लावून ऑक्टोबर 2021 मध्ये सरकारकडून एअर इंडिया विकत घेतली होती. 100 टक्के हिस्सा विकण्यासाठी सरकारने 12,906 कोटी रुपयांची राखीव किंमत ठेवली होती.
टाटा सन्सने 18,000 कोटी रुपयांची बोली लावून ऑक्टोबर 2021 मध्ये सरकारकडून एअर इंडिया विकत घेतली होती. 100 टक्के हिस्सा विकण्यासाठी सरकारने 12,906 कोटी रुपयांची राखीव किंमत ठेवली होती.