Stock Market : ट्रेंट-टीसीएसची यावर्षी खराब कामगिरी, शेअरमध्ये 25 टक्क्यांहून अधिक घसरण, गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले

Tata Group Share: टाटा ग्रुपच्या टीसीएस आणि ट्रेंटच्या शेअरमध्ये मोठी घसरण 2025 मध्ये पाहायला मिळाली. दोन्ही शेअरमध्ये घसरण झाल्यानं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे.

Continues below advertisement

टीसीएस, ट्रेंटचे स्टॉक घसरले

Continues below advertisement
1/5
ट्रेंट आणि टीसीएस या दोन्ही टाटा ग्रुपच्या कंपन्यांची कामगिरी 2025 मध्ये खराब राहिली आहे. निफ्टी 50 वर या दोन्ही कंपन्यांच्या स्टॉकमध्ये 25 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. टीसीएसच्या शेअरमध्ये 25 टक्के घसरण झाली आहे. तर, ट्रेंटच्या स्टॉकमध्ये 30 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. ट्रेंट कंपनी झुडियो आणि वेस्टसाइडच्या ब्रँडस चालवते.
2/5
टाटा ग्रुपची आयटी कंपनी टीसीएसचे शेअर 2008 मध्ये जागतिक आर्थिक मंदीच्या काळात 55 टक्क्यांनी घसरले होते. टीसीएसचा स्टॉक पाच वर्षात गुंतवणूकदारांचै पैसे दुप्पट करतो, असं म्हटलं जातं. गेल्या वर्षात 800 टक्क्यांहून अधिक परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे.
3/5
आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या वाढत्या प्रभावामुं आणि अमेरिकेतील ग्राहकांकडून खर्चात कपात करण्यात आल्यानं कपन्यांना नवे प्रकल्प मिळणं कठिण झालं आहे.
4/5
टीसीएसनं जवळपास 12 हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीचा निर्णय जाहीर केला आहे.कंपनीचे तिमाहीचे निकाल देखील कमजोर होते. ज्यामुळं गुंतवणूकदारांमध्ये निराशा झाली आहे.
5/5
ब्रोकरेज फर्म एलारा कॅपिटलनं टीसीएसचं टारगेट प्राइस 3820 रुपयांवरुन 3780 रुपये केलं आहे. कंपनीचं उत्पन्न आणि नफा यावर दबाव आहे. गोल्डमन सॅक्सनं टीसीएसच्या रेटिंगला डाऊनग्रेड केलं आहे. टीसीएसच्या व्यवस्थापनाला आंतरराष्ट्रीय बाजारात 2025-26 मध्ये 2024-25 च्या तुलनेत चांगली कामगिरीची अपेक्षा आहे. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola