टाटा समुहाच्या 'या' कंपनीने जाहीर केला मोठा लाभांश, गुंतवणूकदार होणार मालामाल!
Dividend Share: टाटा कंपनीने आपल्या शेअरधारकांना डिव्हिडेंडच्या रुपात मोठं गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDividend Stock: टाटा ग्रुपच्या या निर्णयामुळे या कंपनीच्या शेअरधारकांचे खिसे पैशाने भरणार आहेत. या कंपनीचे नाव Tata Elxsi असे आहे.
Tata Elxsi या कंपनीने शेअरधारकांना 70 रुपये प्रति शेअरच्या हिशोबाने डिव्हिडेंड (लाभांश) देण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच कंपनीने लाभांशाची रेकॉर्ड डेटदेखील ठरवली आहे.
कंपनीने या डिव्हिडेंडची रेकॉर्ड डेट 25 जून 2024 ठेवली आहे. ज्या शेअरधारकांकडे या कंपनीचे शेअर्स असतील, त्यांनाच या डिव्हिडेंडचा फायदा मिळेल.
टाटा ग्रुपच्या Tata Elxsi ही कंपनी हेल्थकेयर, ट्रांसपोर्टेशन, कम्युनिकेशन, ऑटोमोटिव्ह, बॉडकास्ट आदीसाठी टेक्नोलॉजी और डिझाइन देण्याचे काम करते.
वित्त वर्ष 2023-24 मध्ये जानेवारी ते मार्च या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 2.32 टक्क्यांनी घट झाली. कंपनीचा नफा घसरून 196.93 रुपयांवर आला होता.
गेल्या वर्षी याच काळात कंपनीने एकूण 201.50 कोटी रुपयांची कमाई केली होती.