TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
TCS Q1 Result : टाटा ग्रुपची आयटी कंपनी टीसीएसनं पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीनं लाभांश देखील जाहीर केला आहे.
Continues below advertisement

टीसीएसकडून लाभांश जाहीर
Continues below advertisement
1/6
टाटा ग्रुपची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. बाजाराच्या अपेक्षेच्या तुलनेत पहिल्या तिमाहीमध्ये टीसीएसला नफा कमी झाला. मात्र, उत्पन्न अंदाजापेक्षा अधिक राहिलं.
2/6
आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा 13349 कोटी रुपये आहे. तर, कंपनीचं उत्पन्न 72275 कोटी रुपये आहे.
3/6
टीसीएसचा वार्षिक आधारावर एआय महसूल 2.6 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. जो गेल्या तिमाहीच्या तुलनेत 13.6 टक्क्यांनी वाढला आहे. टीसीएसनं या तिमाहीच्या काळात 9. 5अब्ज डॉलर्सची कंत्राट मिळवली आहेत.
4/6
टीसीएसचे सीईओ आणि एमडी. के. कृतिवासन यांनी म्हटलं की जागतिक भू राजनैतिक तणाव आणि कमजोर आर्थिक स्थितीमध्ये देखील कंपनीनं सातत्यानं ग्रोथ मिळवली आहे. टीसीएसनं एआयचा व्यवसाय वेगानं वाढवला आहे. मोठी कॉन्ट्रॅक्ट मिळवणे आणि विद्यमान ग्राहकांकडून व्यवसायात वाढ मिळवण्यात कंपनीला यश मिळालं आहे.
5/6
जूनच्या तिमाहीमध्ये टीसीएसमध्ये 593798 कर्मचारी होते. टीसीएसनं निकाल जाहीर करताना लाभांश देखील जाहीर केला आहे. प्रतिशेअर 12 रुपये लाभांश जाहीर करण्यात आला असून रेकॉर्ड डेट 15 जुलै निश्चित करण्यात आली आहे. लाभांशाची रक्कम 31 जुलैपर्यंत खात्यात जमा केली जाईल. दरम्यान टीसीएसच्या शेअरमध्ये आज 8 रुपयांची घसरण झाली. टीसीएसचा शेअर 2049 रुपयांवर पोहोचला आहे. टीसीएसच्या शेअरमध्ये गेल्या सहा महिन्यात 1132 रुपयांची घसरण झाली आहे.
Continues below advertisement
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 09 Jul 2026 06:09 PM (IST)