Stock SIP vs Mutual Fund SIP: स्टॉक एसआयपी की म्यूच्यूअल फंडमधील गुंतवणूक फायद्याची, चांगला परतावा कशातून मिळतो?
Mutual Fund SIP : गुंतवणूकदार त्यांच्याकडील रक्कम विविध ठिकाणी गुंतवत असतात. चांगला परतावा मिळावा, अशी त्यांची अपेक्षा असते.
Continues below advertisement
स्टॉक SIP की Mutual Fund SIP कशातून जास्त परतावा मिळतो?
Continues below advertisement
1/5
आपण ठराविक रकमेची निश्चित कालावधीनंतर गुंतवणूक करतो. म्यूच्यूअल फंडात तुम्ही ठराविक रक्कम जमा करत असता त्यानंतर यूनिट मिळतात. एखाद्या फंडात तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर त्यातील NAV मध्ये बदल होत असतो.
2/5
स्टॉक एसआयपीमध्ये मूळ संकल्पना सारखी असते. मात्र, त्यात काही बदल असतात. ठराविक रकमेपेक्षा स्टॉकची संख्या निश्चित केली जाते. त्यानुसार तुमच्या रकमेची विभागणी केली जाते.
3/5
तुम्ही जर 10 हजार रुपयांची गुंतवणूक करणार असाल तर स्टॉकची रक्कम देखील विचारात घ्यावी लागते.स्टॉक एसआयपी करता त्यावेळी एकाच कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी लागते. अशा वेळी त्या कंपनीच्या स्टॉकच्या कामगिरीवर परतावा अवलंबून असतो. लमसम किंवा वन टाइम गुंतवणूक केली असता थोडाफार फायदा होऊ शकतो.
4/5
म्यूच्यूअल फंडमध्ये विविध स्टॉकमध्ये म्यूच्यूअल फंड मॅनेजरकडून गुंतवणूक केली जाते. थेट गुंतवणूकदार स्टॉक खरेदी करत नाही. फंड मॅनेजर गुंतवणूकदारांची रक्कम घेतात आणि चांगल्या स्टॉकची खरेदी करुन त्याची योग्यवेळी विक्री देखील करतात.
5/5
फंड मॅनेजर प्रत्येक महिन्यात चांगला परतावा देणाऱ्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतात. याशिवाय जे चांगला परतावा देत नाहीत त्याची विक्री करतात. स्टॉक एसआयपीतून फायदा मिळवायचा असल्यास विविध स्टॉकमध्ये एसआयपी करु शकता.फंड मॅनेजर्स प्रमाणं संशोधन करावं लागेल.ट्रेंडिग स्टॉक्सची माहिती घ्यावी लागेल. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Continues below advertisement
Published at : 07 Dec 2024 06:50 PM (IST)