'हे' दोन शेअर आगामी काळात देणार दमदार रिटर्न्स? बड्या ब्रोकरेजला विश्वास!

अॅक्सिस सेक्युरिटीज या ब्रोकरेज फर्मने गुंतवणुकीसाठी दोन सर्वोत्तम शेअर्स सुचवले आहेत. आगामी काळात हे स्टॉक्स चांगला परतावा देऊ शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

share market (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)

1/8
Stocks to BUY: पोझिशनल इन्व्हेस्टर्ससाठी अॅक्सिस सिक्योरिटीजने तीन स्टॉक्स सूचवले आहेत. या स्टॉकसाठी या ब्रोकरेज र्मने 16-18 टक्क्यांचे अपसाईड टार्गेट दिले आहे.
2/8
अॅक्सिस सिक्योरिटीजने HCL Technologies या कंपनीचा शेअर 1885-1849 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
3/8
स्टॉकमध्ये घसरण होत असेल तर 1813 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा, असे या ब्रोकरेज फर्मने सुचवले आहे.
4/8
आगामी 3-4 आठवड्यांसाठी पहिले टार्गेट 1985 रुपये तर दुसरे टार्गेट 2045 रुपये ठेवावे, असे या ब्रोकरेज फर्मने सांगितले आहे.
5/8
अॅक्सिस सिक्योरिटीजने Swan Energy या कंपनीचे शेअर्सही खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 575-565 रुपयांच्या रेंजमध्ये या कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत, असे या ब्रोकरेज फर्मने सांगितले आहे.
6/8
त्यासाठी 530 रुपयांचा स्टॉपलॉस तर 3-4 आठवड्यांसाठी पहिले टार्गेट 650 रुपये आणि दुसरे टार्गेट 670 रुपये ठेवण्याचेही या ब्रोकरेज फर्मने सुचवले आहे.
7/8
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
8/8
सांतेकित फोटो
Sponsored Links by Taboola