'या' तीन कंपन्याचे शेअर्स घेतल्यास पडेल पैशांचा पाऊस, जाणून घ्या सविस्तर!

सध्या शेअर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. असे असताना काही कंपन्यांचे शेअर्स मात्र चांगली कामगिरी करताना दिसतायत.

stock_marekt (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)

1/6
सध्या शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळतोय. या स्थितीत अनेक कंपन्यांच्या शेअर्सच्या मूल्यात घसरण झालेली आहे. तर काही शेअर्स हे अजूनही चांगली कामगिरी करत आहेत. अशा स्थितीत शेअर बाजार एक्सर्प्ट वैशाली पारेख यांनी तीन स्टॉक सांगितले आहेत, ज्यात गुंतवणूक केल्यावर फायदा होण्याची शक्यता आहे.
2/6
वैशाली पारेख या प्रभुदास लीलाधर ब्रोकरेज फर्मच्या टेक्निकल रिसर्चच्या उपाध्यक्षा आहेत. सध्या बाजारातील स्थितीचा अभ्यास करून खालील तीन शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. त्यासाठी त्यांनी टार्गेट आणि स्टॉप लॉसदेखील सांगितला आहे.
3/6
वैशाली पारेख यांनी सांगितल्यानुसार नाल्को कंपनीचे शेअर्स खरेदी करायला हवेत. या कंपनीचे शेअर्स 177 रुपयांवर खरेदी करायला हवे. हे शेअर खरेदी करताना 184 रुपयांचे टार्गेट तर 173 रुपयांचा स्टॉप लॉस लावावा.
4/6
कोफोर्ज या कंपनीचे शेअर्स 4535 रुपयांवर खरेदी करायला हवेत. त्यासाठी 4700 रुपयांचे टार्गेट तर 4440 रुपयांचा स्टॉप लॉस लावायला हवा, असे वैशाली पारेख यांचे मत आहे.
5/6
आदित्य बिरला कॅपिटल या कंपनीचेही शेअर खरेदी करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. या कंपनीचे शेअर खरेदी करताना 232 रुपयांचे टार्गेट ठेवावे. तसेच 222.35 रुपयांवर या कंपनीचे शेअर खरेदी करावेत. हे शेअर खरेदी करताना 217 रुपयांचा स्टॉप लॉस लावावा.
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Sponsored Links by Taboola