Share Market : शेअर बाजारात स्मॉल कॅप, मिड कॅप स्टॉक्समध्ये तेजी, FPI नं रणनीती बदलली, गुंतवणूकदारांना दिलासा

Stock Market : गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरु होतं. मात्र,बुधवारी शेअर बाजारात नाममात्र घसरण पाहायला मिळाली. बीएसई स्मॉलकॅप इंडेक्स आणि मिडकॅप इंडेक्समध्ये तेजी आली.

शेअर बाजार अपडेट

1/6
शेअर बाजारासाठी बुधवारचा (19 फेब्रुवारी) दिवस दिलासादायक ठरला. बीएसई सेन्सेक्स 28 अंकांनी घसरुन 75939.18 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स 76338.58 अंकांपर्यंत गेला होता, त्यानंतर त्यामध्ये घसरण झाली. एनएसईवर निफ्टी 50 हा निर्देशांक 12.40 अंकांनी घसरुन 22932.90 अंकांवर बंद झाला. बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक 2.41 टक्क्यांनी तर मिडकॅप इंडेक्स 1.30 टक्क्यांनी वाढला.
2/6
सेन्सेक्सवर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि इन्फोसिस दोन दोन टक्क्यांनी घसरले.हिंदुस्तान यूनिलीवर, भारती एअरटेल, सन फार्मा, पावर गीरिड, बजाज फिनसर्व, एचसीएल टेक, महिंद्रा अँड महिंद्रा आणि टेक महिंद्राचे शेअर देखील घसरले.तर, झोमॅटोचा शेअर 5 टक्क्यांनी वाढला. याशिवाय लार्सन एंड टुब्रो (एलअँडटी), अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक आणि कोटक महिंद्रा बँकच्या शेअरमध्ये तेजी राहिली.
3/6
मेहता इक्विटीज लिमिटेड चे वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन) प्रशांत तापसे यांनी म्हटलं की आयटी शेअरमध्ये विक्री झाल्यानं बाजारात नकारात्मक स्थिती पाहायला मिळाली. व्यापक पातळीवर बाजारातील चित्र आशावादी आहे. मोठ्या प्रमाणावरील विक्रीनंतर मिडकॅप अन् स्मॉल कॅप शेअरमध्ये तेजी आहे. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी मंगळवारी 4786.56 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली याचा शेअर बाजारावर चांगला परिणाम झाला आहे.
4/6
जिओजीत फायनान्शिअल सर्व्हिसेसचे प्रमुख विनोद नायर यांनी निर्देशांकामध्ये किरकोळ घसरण झाल्याचं म्हटलं. ज्या शेअरमध्ये घसरण झाली त्यामध्ये खरेदी देखील पाहायला मिळाली आहे. विदेशी गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या समभाग खरेदीचा परिणाम बाजारावर पाहायला मिळाली. हे चित्र कधीपर्यंत राहील याबाबत अनिश्चितता असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेकडून आयात शुल्क लावण्यात आणि व्याज दरातील कपातीसंदर्भातील निर्णयाला उशिरामुळं बाजार आशावादी आहे. तिसऱ्या तिमाहीच्या जीडीपीमध्ये सुधारणेची आशा असल्याचं देखील विनोद नायर म्हणाले.
5/6
विदेशी गुंतणूकदार संस्थांकडून भारतीय शेअर बाजारातून दीड लाख कोटींपेक्षा अधिक रक्कम गेल्या सहा महिन्यात काढून घेण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात 78000 कोटी रुपये एफपीआयनं काढून घेतले होते. सप्टेंबर महिन्यातील उच्चांकाच्या पातळीपासून सेन्सेक्स 12 टक्क्यांनी घसरला आहे. सप्टेंबरमध्ये सेन्सेक्स 85900 अंकांवर होता तो सध्या 75 हजारांच्या दरम्यान आहे.
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Sponsored Links by Taboola