Stock Market : विक्रमी तेजीनंतर दुसऱ्याच दिवशी सेन्सेक्स 1282 अंकांनी कोसळला, आयटी कंपन्यांचं सर्वाधिक नुकसान, तीन प्रमुख कारणं...

Share Market : भारतीय शेअर बाजारात सोमवारी मोठी तेजी पाहायला मिळाली होती. त्यानंतर आज त्याच्या उलटी स्थिती पाहायला मिळाली.

शेअर मार्केट

1/7
मजबूत जागतिक संकेत असूनही भारतीय शेअर बाजारात आज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण पाहायला मिळाली. सोमवारी गेल्या चार वर्षातील सर्वाधिक तेजी पाहायला मिळाली होती.
2/7
सोमवारी सेन्सेक्स 2975 अंकांनी तर निफ्टी 50 निर्देशांक 916.7 अंकांनी वधारला होता.सेन्सेक्स 1281.68 अंकांनी घसरुन 81148.22 वर बंद झाला. तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर निफ्टी 50 346.35 अंकांनी घसरुन 24578.35 अंकांवर बंद झाला.
3/7
आजच्या घसरणीत सर्वाधिक नुकसान माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या स्टॉक्सचं झालं. त्यानंतर एफएमसीजी, फायनान्शिअल सर्व्हिसेस, ऑटोमोबाईल आणि खासगी बँकांचा सामवेश आहे.
4/7
भारत पाकिस्तान यांच्यातील तणावाबाबत अनिश्चितता कायम आहे. पाकिस्तानकडून खोडी काढली गेल्यास पुन्हा संघर्ष पेटू शकतो, असं इकोनॉमिक्स रिसर्चच्या जी. चोक्कालिंगम यांनी म्हटलं.
5/7
अमेरिका आणि चीननं 90 दिवसांचं व्यापारयुद्ध थांबवण्याच्या निर्णयावर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशातील व्यापार युद्ध शांत झाल्यास अमेरिका चीनवर लादलेलं टॅरिफ 145 टक्क्यांरुन30 टक्के करु शकतो. तर, चीन अमेरिकेच्या वस्तूंवर लादलेला टॅक्स 125 टक्कयांवरुन 10 टक्के करु शकतं. यामुळं चीन भारताचा प्रमुख स्पर्धक ठरु शकतो.
6/7
आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्सचे तांत्रिक संशोधक जिगर एस पटेल यांच्यानुसार अनेकांनी नफा बुक करण्यासाठी स्टॉकची विक्री केल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
7/7
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारी करारामुळं वॉल स्ट्रीटवर तेजी पाहायला मिळाली. त्याप्रमाणं आशियाई बाजारात देखील तेजी होती. जपानचा निक्केई 2.17 टक्के आणि टॉपिक्स 1.77 टक्के, दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.13 टक्के तर ऑस्ट्रेलियाचा एएसएक्स 200 हा निर्देशांक 0.71 टक्क्यांनी वाढला.(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Sponsored Links by Taboola