Stock in Focus : NSDL सह या 'तीन' स्टॉकवर 3 नोव्हेंबरला लक्ष ठेवा, लॉक इन कालावधी संपणार, बाजारात काय घडणार?
Stock Update : सोमवारी NSDL सह तीन कंपन्यांच्या शेअरवर गुंतवणूकदारांचं लक्ष असेल. कारण या कंपन्यांच्या स्टॉक्सचा लॉक इन कालावधी संपणार आहे.
Continues below advertisement
एनएसडीएल
Continues below advertisement
1/6
भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून तेजीचं सत्र सुरु आहे. सोमवारी 3 नोव्हेंबरपर्यंत एनएसडीएल, श्री लोटस डेव्हलपर्स आणि एम अँड बी इंजिनिअर्सच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांचं लक्ष असेल. कारण या स्टॉकचा लॉक इन कालावधी संपणार आहे.
2/6
एनएसडीएल, श्री लोटस डेव्हलपर्स आणि एम अँड बी इंजिनिअर्सच्या शेअर होल्डिंगमधील एक भाग विक्रीसाठी खुला आहे. ही माहिती नुवामा अल्टरनेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्चच्या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.
3/6
एनएसडीएलचे 75 लाख शेअर सोमवारी बाजारात ट्रेडिंगसाठी उपलब्ध होतील. हे कंपनीच्या इक्विटीच्या एकूण 4 टक्के असतील. सध्या एनएसडीएलच्या या शेअरची किंमत 870 कोटी रुपये आहे. आहे. एनएसडीएलचा आयपीओ आला तेव्हा किंमतपट्टा 800 रुपये होता. लिस्टिंगवेळी एनएसडीएलचा शेअर 1425 रुपयांवर पोहोचला होता. 31 ऑक्टोबरला एनएसडीएलचा शेअर 1158.55 रुपयांवर होता.
4/6
श्री लोटस डेव्हलपर्सचे 79 लाख शेअर ट्रेडिंगसाठी खुले होतील. हे कंपनीच्या एकूण इक्विटीच्या 2 टक्के आहेत. या शेअरचं मूल्य 144 कोटी आहे.
5/6
एम अँड बी इंजिनिअरिंग या कंपनीचे 38 लाख शेअर ट्रेडिंगसाठी उपलब्ध होतील. हे कंपनीच्या इक्विटीच्या 7 टक्के आहेत. याचं एकण मूल्य 172 कोटी रुपये आहे.
Continues below advertisement
6/6
आयपीओ आल्यानंतर अँकर इन्वेस्टर्स, प्रमोटर्स आणि कर्मचाऱ्यांच्या शेअरच्या विक्रीवर काही कालावधी साठी बंधन असतं. त्याला लॉक इन कालावधी म्हटलं जातं. लॉक इन कालावधी संपल्यानंतर शेअर ट्रेडिंगसाठी पात्र होतात. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 02 Nov 2025 11:22 PM (IST)