Share Market News: सेबीचा मोठा निर्णय! शेअर बाजारात तांत्रिक अडचण आल्यास ट्रेडिंगची वेळ वाढणार
स्टॉक एक्सचेंजमध्ये तांत्रिक अडचण आल्यास ट्रेडिंगचा वेळ वाढवण्यात येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभांडवली बाजार नियामक ‘सेबी’कडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
तांत्रिक अडचणींची माहिती त्वरीत बाजारात सहभागी असलेल्यांना 15 मिनिटांच्या आत ब्रॉडकास्ट मॅसेज अथवा वेबसाइटने द्यावी लागणार आहे.
ट्रेडिंग दरम्यान तांत्रिक अडचणी आल्यास त्वरीत ‘सेबी’ला माहिती द्यावी लागणार आहे.
सेबीला ही माहिती दिल्यानंतर ट्रेडिंगची वेळ देखील वाढवली जाऊ शकते.
मार्केट पार्टिसिपेंट्स, ट्रेडिंग मेंबर्स आणि इतर भांडवली बाजार संस्थांना सेबीकडून परिपत्रक जारी करत माहिती देण्यात आली आहे.
स्टॉक मार्केटच्या एक अथवा अधिक मार्केट सेगमेंटमध्ये व्यत्यय आल्यास इतर सुरळीत सुरू असणाऱ्या सेगमेंटमधील व्यवहार सुरू ठेवले पाहिजे.
स्टॉक एक्सचेंजमधील ट्रेडिंग बंद होण्याच्या एक तास आधीच बिघाड दुरुस्त झाल्यास बाजारातील व्यवहाराच्या वेळेत बदल होणार नाही.
जर शेअर बाजार बंद होण्याच्या एक तासाच्या आत ट्रेडिंग सुरू झाली नाही तर ट्रेडिंगची वेळ 90 मिनिटापर्यंत वाढवण्यात येईल.
बाजार बंद झाल्यानंतरच्या 45 मिनिटातही बिघाड दुरुस्त झाला नाही तर, ट्रेडिंगच्या वाढीव वेळेतही व्यवहार करण्यास परवानगी दिली जाणार नाही.