Upcoming IPO : स्टॅण्डर्ड ग्लासच्या आयपीओची जोरदार चर्चा,सबस्क्रिप्शन सुरु होण्यापूर्वीच जीएमपी 61 टक्क्यांवर
IPO Update : स्टॅण्डर्ड ग्लास लायनिंग टेक्नोलॉजीचा आयपीओ 6 जानेवारीला शेअर बाजारात बोली लावण्यासाठी खुला होईल त्यापूर्वीच जीएमपी 61 टक्क्यांवर गेला आहे.
आयपीओ न्यूज
1/6
भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचा आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याकडे कल असतो. 2025 मधील पूर्णपणे पहिला असा मेनबोर्ड आयपीओ म्हणून स्टॅण्डर्ड ग्लास लायनिंग टेक्नोलॉजीचा आयपीओ 6 जानेवारीला खुला होणार आहे.
2/6
या आयपीओचा किंमतपट्टा 133 ते 140 रुपयांदरम्यान आहे. एका लॉटमध्ये 107 शेअर असतील. एका लॉटसाठी रिटेल गुंतवणूकदारांना 14980 रुपयांची बोली लावावी लागेल.
3/6
स्टॅण्डर्ड ग्लासचा आयपीओ गुंतवणुकीसाठी 6 जानेवारीला खुला होईल. हा आयपीओ 8 जानेवारीपर्यंत खुला असेल.शेअर 9 जानेवारीला अलॉट केले जातील. तर, रिफंड 10 जानेवारीला सुरु होतील. शेअर 10 जानेवारीला खात्यात ट्रान्सफर केले जातील. तर, आयपीओ 13 जानेवारीला लिस्ट होईल.
4/6
स्टॅण्डर्ड ग्लास लायनिंग टेक्नोलॉजीचा आयपीओ 410 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आणला जाणार आहे. यामध्ये 210 कोटींचे शेअर नव्यानं जारी केले जातील. तर, 200 कोटींचे शेअर ऑफर फॉर सेल असतील.
5/6
यामध्ये रिटेल गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के कोटा राखीव असेल. संस्थांत्मक गुंतणूकदारांसाठी 50 टक्के आणि उच्च उत्पन्न गटातील गुंतवणकदारांसाठी 15 टक्के कोटा निश्चित असेल. हा आयपीओ बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होईल. केफिन टेक्नोलॉजीज लिमिटेड आयपीओचे रजिस्ट्रार आहेत.कंपनीला 30 सप्टेंबरला संपलेल्या सहा महिन्यांच्या काळात 36.27 कोटींचा नफा झाला आहे. आयपीओचा जीएमपी 86 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच 61.43 टक्क्यांवर पोहोचला आहे.
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 02 Jan 2025 11:54 PM (IST)