IPO Update : शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची तगडी कमाई
शेअर बाजार कोसळत असताना स्टँडर्ड ग्लास लिनिंग टेक्नोलॉजीच्या आयपीओनं शेअर बाजारात धमाकेदार लिस्टिंग केलं आहे. एनएसईवर 22.8 टक्के प्रीमियमसह आयपीओ 172 रुपयांना लिस्ट झाला. तर बीएसईवर 25.71 टक्के प्रीमियमसह 176 रुपयांवर लिस्ट झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्टँडर्ड ग्लासनं 410 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आयपीओ आणला होता. या आयपीओसाठी 6 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान बोली लावली गेली होती. आयपीनं 133-140 रुपये किंमतपट्टा निश्चित केला होता.
शेअर बाजारात घसरणीचा ट्रेंड सुरु असताना स्टँडर्ड लिनिंगचा आयपीओ 185.48 पट सबस्क्राइब झाला होता. 2.05 कोटी शेअरसाठी 380.27 कोटी शेअरच्या बोली लागल्या होत्या.
रिटेल गुंतवणूकदारांकडून 65.71 पट, गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 275.01 पट तर संस्थात्मक गुंतवणकूदारांकडून आयपीओ 327.76 पट सबस्क्राईब झाला होता.
स्टँडर्ड ग्लास लिनिंग आयपीओनं अँकर इन्वेस्टर्सकडून 3 जानेवारीलाच 123 कोटी रुपये उभारले होते. कंपनीनं 210 कोटी रुपयांचे 1.50 कोटी शेअर नव्यानं जारी करण्यात आले आहेत. तर, 200.05 कोटींच्या 1.43 कोटी शेअर ऑफर फॉर सेलद्वारे विकण्यात आले. आय आयपीओच्या एका लॉटमध्ये 107 शेअर होते. ज्या रिटेल गुंतवणूकदारानं एक लॉट घेतला असेल त्याला साधारणपे 3745 रुपयांचा फायदा झाला. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)