Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस' मार्चमध्ये होणार लाँच, काय आहेत वैशिष्ट्य?
देशातील अव्वल तंत्रज्ञान असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची नवीन आवृत्ती लवकरच येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय रेल्वे पुढील वर्षी स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करणार आहे.
स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आराम आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने खूपच चांगली असणार आहे. या ट्रेनमुळं विमानांची क्रेझही कमी होईल, असं बोललं जात आहे.
स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही जागतिक दर्जाच्या ट्रेन्सपैकी एक असेल. ही ट्रेन भारतातील सर्वात वेगवान धावणारी ट्रेन असणार आहे.
अपग्रेड केलेल्या ट्रॅकमुळं ही ट्रेन ताशी 200 किलोमीटर वेगाने धावेल. यामुळं प्रवाशांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
कमी वेळात इच्छित स्थळी पोहोचणं शक्य होणार आहे.
रेल्वे मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन फेब्रुवारी 2019 मध्ये दिल्ली आणि वाराणसी दरम्यान प्रथम सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून त्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. सध्या देशात 34 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जात आहेत.
वंदे भारत एक्सप्रेसची क्षमता इतकी आहे की ती राजधानी एक्सप्रेस ट्रेनला मागे सोडू शकते. वंदे भारत एक्सप्रेस इतर गाड्यांपेक्षा जास्त वेगाने धावणार आहे.
नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये 823 जागा सीट असणार आहेत. या ट्रेनमध्ये एकावेळी 823 प्रवासी प्रवास करु शकतील.