'ही' कंपनी करणार अनेकांना मालामाल, एका शेअरवर देतेय 9 शेअर्स मोफत; आता पडणार पैशांचा पाऊस?

सध्या शेअर बाजारात अनेक कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स देत आहेत. अशीच एक कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देणार आहे.

Continues below advertisement

Sky Gold Ltd free share (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)

Continues below advertisement
1/8
Bonus Share:स्काय गोल्ड लिमिटेड (Sky Gold Ltd) या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी एका शेअरवर तब्बल 9 शेअर्स बोनस म्हणून देणार आहे. बोनस शेअर देण्याची कंपनीची ही दुसरी वेळ आहे.
2/8
स्काय गोल्ड लिमिटेड या कंपनीच्या शेअरचे मूल्य शुक्रवारी 3351.35 रुपये होते.
3/8
26 ऑक्टोबर रोजी या कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार ही कंपनी एका शेअरवर 9 शेअर्स बोनस म्हणून देणार आहे.
4/8
या कंपनीने या बोनस इश्यूसाठी आतापर्यंत रेकॉर्ड डेट तारखेची घोषणा केलेली नाही. लवकरच ही कंपनी आपल्या बोनस शेअरबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.
5/8
याआधी या कंपनीने 2022 साली बोनस शेअरची घोषणा केली होती. 2022 साली या कंपनीने एका शेअरवर एक शेअर बोनस देण्याची घोषणा केली होती. गेल्या दोन वर्षांत कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना दोन वेळा लाभांषही दिलेला आहे.
Continues below advertisement
6/8
स्काय गोल्ड या कंपनीच्या शेअरचे मूल्य गेल्या तीन महिन्यांत 54 टक्क्यांनी वाढले आहे. 6 महिन्यांत या कंपनीने आतापर्यंत गुंतवणूकदारांना 153 टक्क्यांनी रिटर्न्स दिलेले आहेत.
7/8
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
8/8
संग्रहित फोटो
Sponsored Links by Taboola