SIP Calculator : दरमहा 9500 रुपयांच्या एसआयपीनं 5 वर्षात किती रुपयांचा फंड तयार होईल? जाणून घ्या

SIP Investment: गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांपैकी एसआयपी हा लोकप्रिय प्रकार आहे. एसआयपीद्वारे होणारी गुंतवणूक मे महिन्यात 26 हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

एसआयपी गुंतवणूक

1/6
एसआयपी म्हणजे सिस्टमेटिक इन्वेस्टमेंट प्लान होय. एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये किंवा एखाद्या स्टॉकमध्ये देखील गुंतवणूक करता येते. मात्र, आपण म्युच्युअल फंड संदर्भात चर्चा करणार आहोत. एसआयपीद्वारे ठराविक रक्कम दरमहा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवली जाते.
2/6
मार्केटशी लिंक्ड असल्यानं जेव्हा एसआयपीद्वारे केलेल्या गुंतवणुकीच्या परताव्यावर कोणतीही मर्यादा नसते. शेअर बाजारात स्थिती चांगली असल्यास अपेक्षेपेक्षा जास्त रिटर्न मिळतात.
3/6
एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये वार्षिक आधारावर 12 टक्के सीएजीआर रिटर्न अपेक्षित असतो. त्यापेक्षा अधिक सीएजीआरनं गुंतवणूकदारांना परतावा मिळू शकतो.
4/6
जर तुम्ही 9500 रुपयांची एसआयपी दरमहा या प्रमाणं 5 वर्ष गुंतवणूक केली तर तुम्हाला 12 टक्के सीएजीआरद्वारे मोजणी केल्यास 7,83,620 रुपयांचा फंड जमा होऊ शकतो.
5/6
9500 रुपयांप्रमाणं तुम्ही 5 वर्षांमध्ये एकूण 570000 रुपयांची गुंतवणूक कराल. त्यावर तुम्हाला 213620 रुपये रिटर्न म्हणून मिळतील. साधारणपणे पगारातील 20 टक्के रकमेची बचत आणि गुंतवणूक करावी असं म्हटलं जातं. त्यानुसार 20 टक्के गुंतवणुकीचा विचार देखील करता येऊ शकतो.
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Sponsored Links by Taboola