SIP Calculator : 10000 रुपयांच्या दरमहा गुंतवणुकीनं 20 वर्षात किती रुपयांचा फंड तयार होईल? जाणून घ्या समीकरण

SIP Investment : एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रकार लोकप्रिय झाला आहे. भारतीय नागरिकांकडून एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये मोठी गुंतवणूक केली जातेय.

Continues below advertisement

एसआयपी

Continues below advertisement
1/6
म्युच्युअल फंडमध्ये दरमहा छोटी रक्कम गुंतवल्यास मोठा परतावा मिळू शकतो. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करुन गुंतवणूक सुरु ठेवल्यास चांगला फंड तयार होऊ शकतो.
2/6
एसआयपीद्वारे 100, 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरु करता येई शकते. आपण 10000 रुपयांची गुंतवणूक सुरु केल्यास 20 वर्षात किती परतावा मिळू शकतो हे पाहणार आहोत.
3/6
म्युच्युअल फंडमधील चांगली कामगिरी करणाऱ्या फंडमध्ये एसआयपीद्वारे 10 हजार रुपयांची दरमहा एसआयपी सुरु केल्यास 20 वर्ष ती गुंतवणूक सुरु ठेवल्यास गुंतवणूकदाराची गुंतवणूक 24 लाख रुपये होईल. त्याला 12 टक्क्यांप्रमाणं परतावा 67 लाख 98 हजार 574 रुपये मिळेल. म्हणजेच एकूण फंड 91 लाख रुपये 98 हजार 574 रुपये होईल.
4/6
स्टेप अप एसआयपीचा पर्याय निवडल्यास गुंतवणूकदार कोट्यधीश होऊ शकतो. 10 हजार रुपयांच्या एसआयपीनं सुरुवात केल्यास आणि दरवर्षी 10 टक्के स्टेपअप केल्यास आणि 12 टक्के सीएजीआर ग्राह्य धरल्यास गुंतवणूकदाराकडून होणारी गुंतवणूक 68 लाख 73 हजार रुपये असेल. तर त्यावर मिळणारा परतावा 1 कोटी 17 लाख 58 हजार 383 रुपये असेल. म्हणजेच एकूण फंड 1 कोटी 86 लाख 31 हजार 383 रुपये असेल.
5/6
गुंतवणुकीचं वरील गणित आपण एकाच फंडमध्ये सुरु असलेल्या गुंतवणुकीचं पाहिलं. याशिवाय वेगवेगळ्या फंडमध्ये गुंतवणूक केल्यास त्याचा देखील फायदा होऊ शकतो. एसआयपीतून होणाऱ्या गुंतवणुकीमुळं भारतीय अर्थव्यवस्थेला आधार मिळाला आहे. सप्टेंबरमध्ये एसआयपीद्वारे 29361 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
Continues below advertisement
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Sponsored Links by Taboola