Silver Rate : चांदीनं सोन्याला मागं टाकलं, दोन दिवसात तब्बल 20 हजारांनी दर वाढले, चांदी 1 लाख 70 हजारांवर, 2 लाखांच्या दिशेनं वाटचाल
Silver Rate : चांदीच्या दरवाढीनं नवं रेकॉर्ड निर्माण केलं आहे. चांदीचे दर दोन दिवसात 20 हजारांनी वाढले आहेत. सोनं सव्वा लाख रुपयांवर पोहोचलंय.
चांदी दर 20 हजारांनी वाढले
1/7
जागतिक पातळीवर चांदीची मागणी वाढत असताना,मागणीच्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याने,चांदीच्या दरात गेल्या दोन दिवसात तब्बल वीस हजारांची वाढ होऊन चांदीचे दर हे 170000 वर जाऊन पोहोचले आहेत.
2/7
रशिया युक्रेन युद्ध,अमेरिकन फेडरल बँकांचे व्याज दर कमी होण्याचे संकेत,आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे राज बदलणारे धोरण याचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
3/7
गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात मोठी वाढ होऊन सोन्याचे दर 125000 वर जाऊन पोहोचले आहेत.
4/7
एकीकडे असे चित्र असताना,सोन्याला ही किमती मध्ये मागे टाकत ,चांदीच्या दराने तब्बल 170000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
5/7
गेल्या दोन दिवसात वीस हजार रूपयांची वाढ झाल्याने,चांदीच्या दराच्या वाढीचा वेग लक्षात घेण्या सारखा आहे.
6/7
औद्योगिक कारणास्तव चांदीचा वाढलेला वापर,आणि मागणीच्या तुलनेत कमी होणारा पुरवठा हे कारण लक्षात घेता,चांदीचे भाव सोन्याच्या तुलनेत अजूनही वाढू शकत असल्याचा अंदाज आहे.
7/7
जास्त परतावा मिळण्याची शक्यता लक्षात घेता,जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांनी चांदी मधे ही गुंतवणूक करण्यास सुरुवात केल्याने,चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळत आहे,पुढील काही दिवसातच चांदी दोन लाखांचा टप्पा पार करू शकते,असा सुवर्ण व्यावसायिकांचा अंदाज आहे
Published at : 10 Oct 2025 11:30 PM (IST)