Gold Silver Price : चांदीचे दर 30230 रुपयांनी घसरले, सोने 3613 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
Gold Silver Price: सोने आणि चांदीच्या दरातील तेजीनंतर पुन्हा घसरणीचा ट्रेंड सुरु झाला आहे. चांदीचे दर 30230 रुपयांनी घसरले.

सोने चांदी दर
1/5
सोने आणि चांदीच्या दरात दोन दिवसांच्या तेजीनंतर घसरण सुरु झाली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी होण्याची शक्यता आणि डॉलर मजबूत झाल्यानं सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. चांदीचे दर आज 30230 रुपयांनी कमी झाले. तर, सोन्याचे दर 3617 रुपयांनी वाढले.
2/5
आजचा जीएसटीशिवायचा सोन्याचा दर 153012 रुपये प्रति तोळा आहे. तर, चांदीचा दर 252232 रुपये किलो आहे. जीएसटीसह सोन्याचा दर 157602 रुपये आणि चांदीचा दर 259798 रुपये आहे.
3/5
बुधवारी चांदीचा जीएसटीशिवायचा दर 282462 रुपये किलो होता. सोन्याचा जीएसटीशिवाय 156625 रुपये तोळा होतं. सराफा बाजारात सोन्याच्या दरानं 176121 रुपये तोळा असा उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत सोन्याचा दर 23109 रुपयांनी घसरला आहे. तर, चांदीचा दर 29 जानेवारीच्या 385933 रुपयांच्या उच्चांकावरुन 133701 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
4/5
24 कॅरेट सोन्याप्रमाणं 22 कॅरेट सोन्याच्या दरात देखील 3310 रुपयांची घसरण होऊन एक तोळ्याचा दर 140159 रुपये झाला आहे. जीएसटीसह 22 तोळे सोन्याचा दर 144363 रुपये आहे. तर, 23 कॅरेट सोन्याच्या दरात देखील 3599 रुपयांची घसरण होऊन ते 152399 रुपयांवर पोहोचले. जीएसटीसह याचा एका तोळ्याचा दर 156970 रुपये आहे.
5/5
18 कॅरेट सोन्याच्या दरात देखील 2710 रुपयांची घसरण झाली. 18 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 114759 रुपयांवर पोहोचला आहे. तर, 14 कॅरेट सोन्याचा दर 2114 रुपयांनी कमी झाला आहे. 14 कॅरेट सोन्याचा दर 89512 रुपये आहे.
Published at : 05 Feb 2026 04:07 PM (IST)