'या' कंपन्यांनी अनेकांना केलं श्रीमंत, एका वर्षात ठरल्या मल्टिबॅगर्स!
शेअर बाजारात नकतेच सूचिबद्ध झालेल्या अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. या कंपन्यात गुंतवणूक करणारे अवघ्या वर्षाभरात मालामाल झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशाच काही दमदार कंपन्यांविषयी आज जाणून घेऊ या. या कंपन्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर Vruddhi Engineering Works या कंपनीचे नाव येते. ही कंपनी 3 एप्रिल 2024 रोजी बीएसई आणि एसएमई या मंचावर सूचिबद्ध झाली होती. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत साधारण 350 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.
दुसऱ्या क्रमांकावर केपी ग्रीन इंजिनिअरिंग ही कंपनी येते. ही कंपनी शेअर बाजारावर मार्च 2024 मध्ये सूचिबद्ध झाली होती. 21 जूनपर्यंत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 311 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.
ज्योती सीएनसी ऑटोमेशन या कंपनीनेही 305 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. या कंपनीचा शेअर 2024 सालातील जानेवारी महिन्यात सूचिबद्ध झाला होता.
या कंपन्यांसह इतरही अनेक शेअर्स आहेत, जे थेट मल्टिबॅगर ठरले आहेत. यामध्ये अॅक्सिकॉम टेली-सिस्टम्स आणि श्री बालाजी वॉल्व्ह कंपोनन्टस या कंपन्यांचा समावेश आहे.
रुद्र गॅस एंटरप्राईज, ग्रीनहायटेक व्हेंचर्स, स्टोअरेज टेक्नॉलॉजिज अँड ऑटोमेशन, पुणे ई-स्टॉक ब्रोकिंग, बीएलएस ई-सर्हिसेस, मनोज सिरॅमिक या कंपन्यांचे शेअरही बाजारात आले आहेत. या कंपन्यांनी आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न्स दिले आहेत.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)