Share Market : भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तेजी सेन्सेक्स 388 अंकांनी वधारला, निफ्टी 26000 हजारांच्या पार, कारण समोर

Stock Market Today : भारतीय शेअर बाजारात आज सेन्सेक्स 388 अंकांच्या तेजीसह बंद झाला. तर, एनएसईवर निफ्टी 50 नं 26000 चा टप्पा पार केला.

Continues below advertisement

शेअर बाजारात तेजी कायम

Continues below advertisement
1/6
Stock Market News:अमेरिकेसोबत व्यापार करार होण्याची शक्यता वाढल्यानं भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जोरदार तेजी पाहायला मिळाली. सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि ऑटो क्षेत्राच्या दमदार कामगिरीच्या जोरावर सेन्सेक्समध्ये 388 अंकांची तेजी पाहायला मिळाली.
2/6
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 30 शेअरचा सेन्सेक्स 388 अंकांच्या तेजीसह म्हणजेच 0.46 टक्क्यांनी वाढून 84950.95 अंकांवर बंद झाला. तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर निफ्टी 50 मध्ये देखील 103 अंकांची वाढ झाली. निफ्टी 0.4 टक्क्यांच्या तेजीसह 26013.45 अंकांवर बंद झाला.
3/6
इटरनलच्या शेअरमध्ये 1.94 टक्के, मारुती सुझुकी 1.34 टक्के, कोटक महिंद्रा बँक 1.26 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा अॅडव्हान्स 1.11 टक्के, टेक महिंद्रा 1.06 टक्क्यांनी वाढले.
4/6
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्सचा स्टॉक 4.83 टक्क्यांनी घसरला. अल्ट्राटेक सिमेंटचा स्टॉक 0.70 टक्क्यांनी, एशियन पेंटसचा शेअर 0.67 टक्के, भारत इलेक्ट्रॉनिक्स 0.57 टक्क्यांनी आणिटाटा स्टीलचा शेअर 0.43 टक्क्यांनी घसरला.
5/6
जिओजित इन्वेस्टमेंटस लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्ज विनोद नायर यांनी म्हटलं की भारतीय शेअर बाजारात सकारात्मक स्थिती कायम आहे. अमेरिका आणि भारताच्या ट्रेड डीलवर गुंतवणूकादारांचं लक्ष आहे. मिडकॅप कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीतील निकाल चांगले असल्यानं गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे.
Continues below advertisement
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Sponsored Links by Taboola