Stock Market : शेअर बाजारात 4 दिवसानंतर तेजी, सेन्सेक्स 447 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची एका दिवसात 5.42 लाख कोटींची कमाई

Share Market Update: भारतीय शेअर बाजारात 19 डिसेंबरला तेजी पाहायला मिळाली. अमेरिकेत व्याज दर कपातीची अपेक्षा वाढल्यानं खरेदी पाहायला मिळाली.

Continues below advertisement

शेअर बाजार अपडेट

Continues below advertisement
1/6
सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात 19 डिसेंबरला तेजी पाहायला मिळाली. अमेरिकेत व्याज दर कपातीच्या अपेक्षा वाढल्यानं खरेदी वाढली. सेन्सेक्समध्ये 447.55 अंकांची वाढ होऊन तो 84929.36 अंकांवर बंद झाला. निफ्टी 150.85 अंकांच्या तेजीसह 25966.40 अंकांवर बंद झाला. निफ्टी 25900 अंकांच्या वर बंद होणं बाजारासाठी सकारात्मक मानलं जातंय.
2/6
मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. बीएसई मिडकॅप निर्देशांक आणि स्मॉलकॅप निर्देशांकात 1 टक्के तेजी पाहायला मिळाली. ऑटो, फार्मा, ऑईल अँड गॅस, रिअल्टी, टेलिकॉम आणि हेल्थकेअर निर्देशांक तेजीसह बंद झाले.
3/6
आठवड्याचा विचार केला असता सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण दिसून येते. आठवड्याच्या शेवटी बाजारात तेजी दिसून येणं सकारात्मक मानलं जातंय. बीएसई वर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 471.21 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं.
4/6
गुरुवारी बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचं बाजारमूल्य 465.79 लाख कोटी रुपये होते. त्यात 5.42 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. म्हणजेच गुंतवणूकदारांची संपत्ती 5.42 लाख कोटी रुपयांनी वाढली.
5/6
बीएसई सेन्सेक्सवरील टॉप 30 पैकी 26 शेअरमध्ये तेजी दिसून आली. भारत इलेक्ट्रॉनिक्स, पॉवरग्रीड, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल, एशियन पेंटस आणि रिलायनं इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, एचसीएल टेक, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा या कंपन्यांच्या स्टॉकमध्ये घसरण झालीय
Continues below advertisement
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Sponsored Links by Taboola