चिंता सोडा! 'या' पाच स्टॉक्समध्ये पैसे गुंतवा अन् तगडे रिटर्न्स मिळवा, एकदा वाचाच!
सध्या इराण-इस्रायल यांच्यातील तणावामुळे भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. या अस्थिरतेत अनेक लोकांचे पैसे बुडाले आहेत. मात्र राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजार गटांगळ्या खात असताना अशा काही कंपन्या आहेत, ज्यांच्यात दीर्घ मुदतीसाठी पैसे गुंतवल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appब्रोकरेज हाऊस शेरखानने अशा पाच कंपन्यांची शिफारस केली आहे, ज्यात दीर्घ मुदतीसाठी पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळू शकतो. यात पहिल्या क्रमांकावर Lupin कंपनी आहे. या कंपनीचे शेअर खरेदी करू टार्गेट 1868 रुपये ठेवण्याचा सल्ला शेरखानने दिला आहे. 15 एप्रिल 2024 रोजी या शेअरचे मूल्य 1609 रुपये होते. आज (16 एप्रिल) हा शेअर 1613 रुपयांवर ट्रेंड करतोय.
शेरखानने Exide या कंपनीचे शेअरही खरेदी करून टार्गेट 477 रुपये ठेवण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरचा 15 एप्रिल 2024 रोजीचा भाव 409 रुपये होता. सध्या या कंपनीचा शेअर 445.30 रुपयांवर ट्रेंड करतोय.
TCI चेही शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला शेरखानने दिला असून प्रतिशेअर टार्गेट प्राईज 1030 ठेवावे असे शेरखानने म्हटले आहे. 15 एप्रिल 2024 रोजी या शेअरचे मूल्य 844 रुपये होते. सध्या हा शेअर 862.60 रुपयांवर ट्रेंड करतोय.
शेरखाने Marico कंपनीचे शेअर खरेदी करावे असे सांगितले असून प्रतिशेअर टार्गेट 645 रुपये ठेवण्याचा सल्ला शेअरखानने दिला आहे. 15 एप्रिल 2024 रोजी या शेअरचे मूल्य 509 रुपये होते. सध्या या शेअरचे मूल्य 509.10 रुपये आहे.
Oil India कंपनीदेखील शेअर बाजारावर चांगली कामगिरी करत असून तिचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला शेरखानने दिला आहे. या शेअरची टार्गेट प्राईज 755 रुपये ठेवावे असे शेरखानने म्हटले आहे. 15 एप्रिल 2024 रोजी या कंपनीच्या शेअरचे मूल्य 622 रुपये होते. आज या कंपनीच्या शेअरचे मूल्य 6.24. रुपये आहे. (आम्ही कोणत्याही कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत नाही. फक्त माहिती देणे हाच या लेखामागचा उद्देश आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करायची असल्यास या क्षेत्रातील तज्ज्ञांशी सल्ला घ्या.)