Share Market : विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2025 मध्ये भारतीय बाजारातून 2 लाख कोटी काढून घेतले, सर्वाधिक फटका 'या' क्षेत्रांना

Share Market Update : विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून तब्बल 2 लाख कोटी रुपये 2025 या वर्षात काढून घेतले.

Continues below advertisement

शेअर मार्केट अपडेट

Continues below advertisement
1/6
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक 2025 मध्ये कमी केली आहे. एफआयआयनं 2025 मध्ये भारतीय बाजारातून जवळपास 2 लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत.
2/6
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातील प्रामुख्यानं 6 क्षेत्रातील शेअरची विक्री करत पैसे काढून घेतले.असाच ट्रेंड 2026 मध्ये कायम राहणार का असा प्रश्न आहे.
3/6
एफआयआयच्या विक्रीचा सर्वाधिक फटका आयटी कंपन्यांना बसला आहे. आयटी शेअरची विक्री करत कंपन्यांनी 79155 कोटी रुपये काढून घेतले. त्या पाठोपाठ 32361 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री एफआयआयनं केली. ऊर्जा क्षेत्र 25887 कोटी, आरोग्य सेवा 24324 कोटी, कंझ्युमर ड्युराबल्स 21567 कोटी आणि ग्राहक सेवा 19914 कोटी रुपये विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतले.
4/6
कॅलेंडर वर्ष 2025 मध्ये विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून 17.8 अब्ज अमेरिकन डॉलर्सची विक्री केली. रिअल्टी क्षेत्रातून 12364 कोटी, वित्तीय सेवा क्षेत्रातून 10894 कोटी ऑटोमोबाईल क्षेत्रातून 9242 कोटी रुपयांची गुंतवणूक एफआयआयनं काढून घेतली.
5/6
दुसरीकडे टेलिकॉम क्षेत्रात 47109 कोटी रुपयांची गुंतवणूक वाढली. ऑईल अँड गॅस क्षेत्रा 9076 कोटी आणि सेवा क्षेत्रात 8112 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.
Continues below advertisement
6/6
बँक ऑफ ऑफ अमेरिकेचे भारतातील प्रमुख अमिश शाह यांनी भारतीय बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचा पैसे काढून घेण्याचा ट्रेंड लवकर संपेल असा अंदाज वर्तवला. भारतीय बाजारात पुन्हा गुंतवणूक होऊ शकते, असाही अंदाज त्यांनी वर्तवला. विदेशी गुंतवणूकदारांनी भारताच्या तुलनेत इतर बाजारांमधून अधिक परतावा मिळत असल्यानं तिकडे गुंतवणूक केली. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Sponsored Links by Taboola