IPO Update : गुंतवूकदारांना कमाईची मोठी संधी, दोन कंपन्यांचे आयपीओ खुले होणार, GMP कितीवर पोहोचला?

IPO Update : भारतीय शेअर बाजारात आज दोन कंपन्यांचे आयपीओ बोली लावण्यासाठी खुले होणार आहेत. यामध्ये एक मेनबोर्ड आणि एक एसएमई आयपीओचा समावेश आहे.

आयपीओ अपडेट

1/6
भारतीय शेअर बाजारात आज (22 जानेवारी) ला दोन कंपन्यांचे आयपीओ खुले होणार आहेत. यामध्ये डेन्टा वॉटर कंपनीच्या आयपीओचा समावेश आहे. डेन्टा वॉटर कंपनीचा आयपीओ 220.50 कोटींच्या उभारणीसाठी येत आहे.
2/6
डेन्टा वॉटर आयपीओ पूर्णपणे नव्यानं इक्विटी शेअर जारी करणार आहे. कंपनी एकूण 75 लाख नवे शेअर जारी करेल. 22 जानेवारी ते 24 जानेवारीपर्यंत बोली लावता येईल.
3/6
या आयपीओचा किंमतपट्टा 279 ते 294 रुपयांदरम्यान आहे. एका लॉटमध्ये 50 शेअरचा समावेश आहे. एका लॉटसाठी किमान 14700 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. इन्वेस्टरगेन नुसार ग्रे मार्केट प्रिमियम 50 टक्क्यांहून अधिक असून 165 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
4/6
रेक्स प्रो एंटरप्रायझेस एसएमई आयपीओ आणणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 53.65 कोटी रुपयांची उभारणी करेल. यामध्ये नव्या आणि जुन्या शेअरच्या विक्रीचा समावेश असेल. कंपनी 32.50 लाख शेअर नव्यानं जारी करणार आहे. तर 4.50 लाख जुन्या शेअरची विक्री करेल.
5/6
रेक्सप्रो एंटरप्रायझेसचा आयपीओ बोली लावण्यास 22 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान खुला असेल. आयीपओचा किंमतपट्टा 145 रुपये आहे, एका लॉटमध्ये 1 हजार शेअर आहेत. त्यामुळं किमान 145000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. सध्या आयपीओचा जीएमपी 48 रुपयांवर ट्रेड करत आहे.
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Sponsored Links by Taboola