आजच्या शेअर बाजाराची सुरुवात नेमकी कशी झाली? सेन्सेक्स अन् निफ्टीची स्थिती कशी?
दिवस उजाडला की शेअर मार्केटकडे डोळे लावून बसलेल्यांना आठवड्याच्या सुरुवातीला दिलासा मिळाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शेअर बाजारात (Share Market) असलेला खरेदीचा जोर आज या आठवड्याच्या पहिल्या दिवशी कायम आहे.
आज बाजारात तेजी दिसून येत आहे. शेअर बाजारात (Share Market) खरेदीचा जोर दिसून येत आहे.
सकाळच्या सत्रात सेन्सेक्स (Sensex updates) 240 अंकांनी वधारला आहे तर निफ्टी 74 अंकांनी वर गेला आहे.
निफ्टी बॅंक निर्देशांकातही 155 अंकांची उसळी दिसून आली
डॉलरच्या तुलनेत रुपया 5 पैशांनी कमकुवत झाला आहे. आता रुपया 79.63 प्रति डॉलरवर उघडला आहे.
मेटल आणि आयटी क्षेत्रातील समभागात चांगली तेजी दिसून येत आहे.
हिंदाल्को, टेक महिंद्रा, टाटा स्टील, इन्फोसिस आणि रिलायन्सच्या समभाग उसळी घेतली आहे.
कच्च्या तेलाचे भाव 93 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत
. तेलाच्या किंमती खाली आल्यानंतर पुन्हा 4 टक्क्यांनी वधारल्या आहेत.