SIP : गुंतवणूकदारांचा SIP वरील विश्वास वाढला, जून महिन्यात एसआयपीद्वारे गुंतवणूक वाढली, नवी आकडेवारी समोर
SIP : सिस्टमेटिक इन्वेस्टमेंट प्लॅनद्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढत असल्याचं पाहायला मिळतंय.
Continues below advertisement
एसआयपी गुंतवणुकीचा उच्चांक
Continues below advertisement
1/6
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडस इन इंडियाच्या आकडेवारीनुसार एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडची गुंतवणूक 27269 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जून महिन्यात एसआयपीद्वारे गुंतवणुकीनं उच्चांक गाठला आहे. मे महिन्यातील गुंतवणूक 26688 कोटी रुपये होती.
2/6
एसआयपीच्या एकूण खात्यांची संख्या 9.06 कोटींवरुन वाढून 9.19 कोटी इतकी झाली आहे. जून महिन्यात गुंतवणूक करणाऱ्या सक्रीय खात्यांची संख्या 8.64 कोटी इतकी होती. जी मेमध्ये 8.56 कोटी इतकी होती. जून महिन्यातील नोंदणीकृत नव्या एसआयपी खात्यांची संख्या देखील 6.19 कोटी इतकी होती.
3/6
मोतीलाल ओसवाल एएमसीचे कार्यकारी संचालक आणि बिसनेस ऑफिसच्या अखिल चतुर्वेदी यांच्या माहितीनुसार एसआयपी रजिस्ट्रेशन आणि गुंतवणुकीनं आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. एसआयपीद्वारे गुंतवणुकीची रक्कम 27300 कोटींवर पोहोचली आहे. जवळपास 600 कोटींची वाढ झाली आहे. यामधून रिटेल गुंतवणूकदारांचा विश्वास दिसून येतो.
4/6
मिरे इनवेस्टमेंट मॅनेजर्स मधील डिस्ट्रीब्युशन आणि स्ट्रॅटेजिक अलायन्सेस च्या हेड सुरंजना बोरठाकूर यांच्या मते AMFI चे जून 2025 च्या आकडेवारीनुसार रिटेल गुंतवणूकदारांचं योगदान दिसून येतं. एसआयपीद्वारे गुंतवणूक 27000 कोटींवर पोहोचली आहे. हे गुंतवणूकदारांच्या विश्वासाचं निदर्शक असल्याचं ते म्हणाले.
5/6
इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये देखील जून महिन्यात गुंतवणूक वाढली असून ती 23586 कोटी इतकी झाली आहे. फ्लेक्सी कॅप, लार्ज कॅपमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंडसमध्ये 25-30 टक्के वाढ झाली आहे.
Continues below advertisement
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 09 Jul 2025 06:03 PM (IST)