सध्या शेअर बाजारात तुफान तेजी, पण 'हे' म्युच्यूअल फंड अजूनही तोट्यात, जाणून घ्या सविस्तर!
सध्या शेअर बाजार रोज नवनवे रेकॉर्ड करत आहे. गेल्या एका महिन्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स दहा हजार अंकांनी वाढला आहे. 2024 सालात आतापर्यंत हा बाजार 10 टक्क्यांनी वाढले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअसे असले तरी काही गुंतवणूकदारांना मात्र तोट्याचा सामना करावा लागला आहे. सध्या या वर्षाचे सहा महिने संपले आहेत. सध्या कमीत कमी 13 असे म्युच्यूअल फंड आहेत, ज्यांत गुंतवणूक करून गुंतवणूकदार कमीत कमी 20 टक्क्यांनी तोट्यात आहेत.
एचएसबीसीचा ब्राझील फंड हा सर्वाधिक तोट्यात आहे. यात गुंतवणूक करणारे 19.65 टक्क्यांनी तोट्यात आहत. तर महिंद्रा मॅन्यूलाइफ एशिया पॅसिफिक रीट फंड ऑफ फंड 14.27 टक्क्यांनी पडलेला आहे. 10 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीत हे दोन फंड आहेत.
2024 सालातील पहिल्या सहामाईत कोटक इंटरनॅशनल रीट फंड ऑफ फंड 8.71 टक्क्यांनी तर मिराये असेट ग्लोबल इलेक्ट्रिक अँड ऑटोनोमस व्हेइकल्स ईटीएफ फंड ऑफ फंड 8.11 टक्क्यांनी तोट्यात आहे .
डीएसपी के 3 इंटरनॅशनल फंड डीएसपी वर्ल्ड अॅग्रीकल्चर, डीएसपी वर्ल्ड एनर्जी आणि डीएसपी वर्ल्ड माइनिंग हे क्रमश: 4.27 टक्के, 3.42 टक्के आणि 1.39 टक्क्यांनी तोट्यात आहेत.
याशिवाय इन्वेस्को पॅन यूरोपियन इक्विटी एफओएफ, मिराए अॅसेट हँगसेंग टेक ईटीएफ एफओएफ, अॅक्सिस यूएस ट्रेजरी डायनॅमिक बॉन्ड ईटीएफ फंड ऑफ फंड 0.41 टक्के ते 1.12 टक्क्यांनी तोट्यात आहेत.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)